सुलतानपूर, बिबी, अंजनी खूर्द येथे महाराजस्व समाधान शिबिरे यशस्वी

admin 2 Min Read
2 Min Read

– अनेकांनी घेतला शिबिराचा लाभ; राज्य सरकारच्या सर्व विभागांचा सहभाग

लोणार (वाजिद खान) – तालुक्यातील सुलतानपूर, अंजनीखूर्द व बिबी येथे लोणार तहसील कार्यालयाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर काल, दि. १८ जूनरोजी संपन्न झाले. या शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत, अनेक योजनांची माहिती जाणून घेत, अभियानाला प्रतिसाद दिला.

सुलतानपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणात आयोजित शिबिरात सर्व शासकीय विभाग सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या सर्व जनकल्याणाच्या योजनांची माहिती व अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली. या मध्ये अ‍ॅग्रीस्टॅक, महसूल विभाग, संजय गांधी निराधार योजना विभाग, पुरवठा विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पशु वैद्यकीय विभाग, बँक आणि इतर विभागांचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी उपस्थित दर्शवित नागरिकांच्या अडचणी जाणून घेत पूर्तता केली. तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनात ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नायब तहसीलदार योगीश्री परळीकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखील पिसे, मंडळ अधिकारी जयदेव येऊल, ग्रामविकास अधिकारी गजानन कावरखे, नंदकिशोर तेजनकर, महसूल ग्राम अधिकारी संतोष पनाड, राजेश भाकडे, फोलाने, कृषी सहाय्यक देशमुख, पंचायत समितीचे कडुकर, गायकवाड, महसूल विभागाचे बोरे, कोळेकर, गोंड, प्रविण सुरुशे, आव्हाळे, सेतु संचालक विजय खेत्रे, मोहसीन खान, इम्रान शाह यांच्यासह आंगणवाडी सेविका यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तुपकर, जायभाये व उपसरपंच गोपाल भानापुरे, ज्ञानेश्वर हरकाळ, कष्टकरी संघाचे अध्यक्ष सागर पनाड, भाऊराव भालेराव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार परळीकर यांनी वृक्षभेट देत उपस्थितांचा सत्कार केला.

Share This Article
Exit mobile version