झेडपी, पंचायत समित्यांच्या निवडणुकांत संभाजी ब्रिगेडही उतरणार!

admin 3 Min Read
3 Min Read

– जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा घेतला जिल्हा बैठकीत आढावा
– नांदुरा येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक उत्साहात संपन्न

नांदुरा/बुलढाणा (राजेश लोखंडे) – सध्या महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेडने संपूर्ण ताकदीनिशी या निवडणुकांसाठी कंबर कसली असून, पक्षाचे केंद्रीय निरीक्षक प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. याच पार्श्वभमीवर काल, दि. १८ जूनरोजी बुलढाणा जिल्ह्याची बैठक नांदुरा येथे संपन्न झाली. या बैठकीला केंद्रीय निरीक्षक म्हणून संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री सुधीर देशमुख व महाराष्ट्र सोशल मीडिया चीप कॉर्डिनेटर तथा विभागीय अध्यक्ष शिवश्री गजानन भोयर व प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील यांची उपस्थिती लाभली. या बैठकीत जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा सखोलपणे आढावा घेण्यात आला.

या बैठकीत सर्वप्रथम जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक जिजाऊ वंदना घेण्यात आली. यानंतर वरिष्ठांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर शिवश्री गजानन भोयर यांनी आगामी निवडणुका कशा लढवायच्या, पक्षाची रणनीती काय असणार, कार्यकर्ते कसे सक्षम बनवायचे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सुधीर देशमुख यांनी नवीन लोक कसे जुळतील, तुमची तयारी कशी असावी, जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांना त्यांच्या कामाच्या पद्धतीत काय बदल करावा, याबद्दल मार्गदर्शन केले. सोबतच योगेश पाटील व डॉ.शरद पाटील यांनी आम्ही पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीमागे उभे आहोत, असे आश्वासन दिले. यावेळी मराठा सेवा संघ नांदुरा तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर चोपडे सर, संभाजी ब्रिगेड बुलढाणा उत्तर जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील, जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे, जिल्हा सचिव मंगेश सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष चेतन धुमाळ, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे, जिल्हा कायदे सल्लागार अ‍ॅड. पवन चव्हाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील संबारे, जिल्हा संघटक संजय ससाणे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन सोळंके, खामगांव तालुकाध्यक्ष कृष्णा वडोडे, जळगाव जामोद तालुकाध्यक्ष रामा रोठे, नांदुरा तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे, मलकापूर तालुकाध्यक्ष राहुल संबारे, नांदुरा तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनस्कार, तालुका कार्याध्यक्ष संतोष सोळंके, शाखाध्यक्ष विशाल घोंगटे, अमोल क्षीरसागर, विशाल इंगळे, नायारान चव्हाण, विनायक धांडे, ज्ञानेश्वर पांडे, धनंजय बाठे, अमोल सावरकर, अभिषेक संबारे, तुषार पाखरे, इत्यादींची उपस्थित होते.
यावेळी कुलदीप डंबेलकर यांची बुलढाणा जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच संभाजी ब्रिगेड तालुका सचिवपदी रोशन चोपडे, तालुका संघटकपदी प्रकाश खंडागळे, निमगाव पंचायत समिती सर्कल प्रमुखपदी सोपान इंगळे, अल्पसंख्याक आघाडी संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्षपदी हाजी गफ्फार, संभाजी ब्रिगेड ऑटो युनियन तालुकाध्यक्षपदी विलास वक्टे यांची नियुक्ती करण्यात आली. सोबतच मलकापूर तालुका कार्यकारणीमध्ये सुद्धा तालुका उपाध्यक्ष पदी श्रीकृष्ण गावंडे, तालुका उपाध्यक्ष पदी गणेश सोनोने, तालुका कार्याध्यक्ष पदी नंदकिशोर संबारे, तालुका कार्याध्यक्ष पदी माधव रत्नपारखी, तालुका सचिव पदी पवन संबारे, तालुका प्रसिद्धीप्रमुख पदी दीपक निंबोळकर, तालुका संपर्कप्रमुख पदी गणेश दहीभाते, तालुका कार्याध्यक्ष पदी अभिषेक संबारे, मलकापूर शहराध्यक्ष पदी राहुल यादगिरे, शहर उपाध्यक्ष पदी दापक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा सचिव मंगेश सोळंके यांनी केली तर सूत्रसंचालन वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदचे मा.बुलढाणा जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख सर यांनी केले.

Share This Article
Exit mobile version