अमरावतीचा अट्टल चोरटा हरणी फाट्यावरील नाकाबंदीत अमडापूर पोलिसांच्या जाळ्यात!

admin 3 Min Read
3 Min Read

– तीन लाख २० हजारांच्या रोख रकमेसह दुचाकी जप्त; आरोपीस अटक करून अमरावती पोलिसांकडे सुपूर्त!

अमडापूर (अझहर शेख) – अमरावती येथे ट्रकमधून साडेतीन लाख रूपयांची चोरी करून पळून आलेल्या अट्टल चोरट्यास अमडापूर पोलिसांनी हरणी फाटा येथील नाकाबंदी दरम्यान रंगेहाथ पकडून जेरबंद करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक युवराज राठोड यांच्या पथकाने ठाणेदार निखील निर्मळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात घडणार्‍या चोर्‍यांना प्रतिबंध बसवण्याच्या उद्देशाने पोलिस स्टेशन हद्दीत वेळोवेळी अचानक नाकाबंदीचे आयोजन करून संशयित वाहन, इसमांना झाडाझडती करण्याबाबत पोलिस अधीक्षक यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार व त्या संबंधाने अतिरिक्त पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात काल, दि. १८ जूनला ठाणेदार निखिल निर्मळ यांनी अचानक नाकाबंदीचे आयोजन करून अमडापूर पोलिस स्टेशन हद्दीत हरणी फाट्यावरती पोलिस उपनिरीक्षक युवराज राठोड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती चके, पोना. गजानन काकडे, रणजित सरोदे यांना नाकाबंदी करण्यासाठी नेमले होते. नाकाबंदी सुरू असताना एक संशयास्पद इसम मोटरसायकलने जात असताना त्याला थांबवून विचारणा केली असता, त्याने आपले नाव शेख रिजवान शेख उस्मान (वय ४०) राहणार शिरसगाव (कसबा) जि.अमरावती असे सांगितले व पोलिसांना संशय आल्यामुळे त्या इसमाची झाडाझडती घेतली असता, त्याकडून पाठीवरील बॅगमधून रोख ३ लाख रुपये व त्यांच्या खिशातून नगदी २० हजार २१० रुपये असे एकूण तीन लाख २० हजार २१० रुपये व बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटरसायकल अंदाजे किंमत ३२ हजार रूपये तसेच दिनांक १७ जूनरोजी मोटरसायकल खरेदीची चिट्टी असा मुद्देमाल संशयित इसमाच्या अंगझडतीत मिळून आला.
सदर संशयित इसमाविषयी माहिती घेतली असता, संशयित इसमाविरुद्ध राजापेठ पोलिस स्टेशन, अमरावती शहर येथे त्याने ट्रकमधून साडेतीन लाख रूपये चोरी करण्याबाबत गुन्हा दाखल आहे, अशी माहिती अमडापूर पोलिसांना मिळाली. सदर संशयित आरोपी व मुद्देमालासहित राजापेठ पोलिस स्टेशन तपास अधिकारी यांना सुपूर्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी बी महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, स्थानिक गुन्हा शाखा बुलढाणाचे पोलिस निरीक्षक श्री लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमडापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार निखिल निर्मळ, पोलिस उपनिरीक्षक युवराज राठोड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती चके, पो.हे.कॉ.भगवान शेवाळे, पोना. गजानन काकडे, पोकॉ. रंणजीत सरोदे, तसेच जिल्हा वाहतूक शाखा बुलढाणा पोहेकॉ प्रदीप अवसरमोल, पोकॉ दीपक सपकाळ यांनी कार्यवाही केली आहे.

Share This Article
Exit mobile version