मशाल फेरीने झाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची जनजागृती

admin 1 Min Read
1 Min Read

चिखली (राजेश लोखंडे) – तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथे प्रभात फेरीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची जनजागृती करण्यात आली. योजनेची माहिती जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत पोहोचावी, यासाठी दि. १३ जूनरोजी पळसखेड सपकाळ येथे पारंपरिक पद्धतीने मशाल फेरी व दि. १४ जूनरोजी सकाळी प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

चिखली तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कपिल कंकाळ, व्ही. आर.धांडे, उप कृषी अधिकारी डि.व्ही.सिताफळे, सोहम बेलोकार, सहाय्यक कृषी अधिकारी डि.डि.भोलाने व कृषी विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये मशाल फेरी व प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा प्रकल्प आढावा अंतर्गत तसेच गाव हवामान आराखडा मसुदा तयार करण्यासाठी दि. १३ जून ते दि. १९ जून या कालावधीमध्ये विशेष सात दिवसाचे कार्यक्रमाचे आयोजन पळसखेड सपकाळ येथे करण्यात आले आहे. या प्रभात फेरीमध्ये गावातील शेतकरी वर्ग, कृषी विकास समिती अध्यक्ष, गटग्रामपंचायत धोडप पळसखेड सपकाळचे उपसरपंच अशोक सपकाळ, ग्रा.पं.कर्मचारी पांडुरंग गाडेकर, बचतगट महिला व शेतकर्‍यांची याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share This Article
Exit mobile version