पीक नुकसानीची भरपाई मिळाली नाही; शेतकरी पेट्रोलची कॅन घेऊन आमदाराच्या घरी गेला!

admin 1 Min Read
1 Min Read

– आमदार संजय कुटे यांचे निवासस्थान पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न; शेतकर्‍यास पोलिसाकडून अटक!

जळगाव जामोद/बुलढाणा (राजेश लोखंडे) – अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीचा मोबदला न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍याने भाजपचे आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानी पेट्रोलची कॅन घेऊन येत, त्यांचे निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.१४) घडला. याप्रकरणी, संबंधित शेतकर्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे, की जळगाव जामोद मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय कुटे हे शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी हजर असताना, संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुड यांनी त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात प्रवेश मिळवला, व हातात पेट्रोलचे कॅन घेऊन मला अतिवृष्टीमुळे पीकनुकसानीचा मोबदला अद्याप न मिळाल्याने मी आमदारांचा बंगला जाळून टाकतो, अस्âे म्हणत पेट्रोलचे कॅन घेऊन बंगल्याच्या प्रवेशद्वाराकडे मार्गक्रमण केले. शेतकरी विशाल मुरूड हे बंगल्याच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना, आमदार कुटे यांचे स्वीयसहाय्यक यांनी त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिसांनी शेतकरी विशाल मुरूड यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास जळगाव जामोद पोलिस करत आहेत. सदर शेतकर्‍याचे आंदोलन हे प्रतिकात्मक असल्याचे सांगण्यात येत असून, पोलिस मात्र कठोर कारवाईच्या तयारीत असल्याने हा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Share This Article
Exit mobile version