किनगावराजा पोलिसांची समृद्धी महामार्गावर धडक कारवाई; चार लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत!

admin 2 Min Read
2 Min Read

– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या वृत्ताची दखल; अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी उचलले ठोस पाऊल!

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – समृद्धी महामार्गावर सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने दि. ११ जूनरोजी प्रकाशित केलेल्या सडेतोड वृत्ताची किनगावराजा पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन, काल मध्यरात्रीच्या सुमारास धडाकेबाज कारवाया करत चार लाखांचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना अटक केली. हे कारवाईसत्र यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तढेगाव शिवारात समृद्धी महामार्ग, नागपूर लेन, चॅनेल क्र. ३१९ वर रात्री ८:४० ते ९:०० वाजेदरम्यान एक अवैध रेतीने भरलेले चार ब्रास टिप्पर जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला असून, दि. १३ जून २०२५ रोजी पहाटे १:०७ वाजता गुन्हा क्रमांक: १५१/२०२५. गजानन धनाजी वाघ (वय २९), देविदास फकिराबा निकम (वय ३२),
(रा. जवळखेड, ता. देऊळगाव राजा) टिप्पर क्रमांक एमएच २८ बीबी ३८१५ हे ४ लाख रूपये किमतीचे जप्त केले आहेत. तसेच, या टिप्परमध्ये चार ब्रास वाळू आढळून आली असून, तीही जप्त करण्यात आली आहे. आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक शरद ठोंबरे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली असून, तपासाची जबाबदारी पो.हे.कॉ. विष्णु मुंढे यांच्याकडे देण्यात आली आहे. फिर्याद पोकॉ. सुभाष गिते यांनी दाखल केली आहे.


ब्रेकिंग महाराष्ट्रने प्रकाशित केलेल्या ११ जूनच्या बातमीमुळेच प्रशासनाला वस्तुस्थिती समजली व तत्काळ कारवाई शक्य झाली. ही घटना मुक्त पत्रकारितेचे व सामाजिक उत्तरदायित्वाचे उदाहरण ठरते. अवैध व्यवहारांना लगाम बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समृद्धी महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पावर सुरू असलेली अवैध रेती वाहतूक ही केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर पर्यावरण व सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणालाही धोका आहे. अशा कारवायांमुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेला बळ मिळत आहे.

समृद्धी महामार्गावरून धडधडीत अवैध रेती वाहतूक सुरू!

Share This Article
Exit mobile version