सिंदखेडराजा तालुक्यातील तिन्ही मंडळांत उद्या एकत्रित महाराजस्व समाधान शिबिरे; जनतेच्या दारी शासकीय सेवा!

admin 1 Min Read
1 Min Read

– साखरखेर्डा, शेंदुर्जन व दुसरबीड मंडळांमध्ये एकाचवेळी शिबिर; प्रशासन व नागरिकांमध्ये विश्वासाचे नवे नाते निर्माण!

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने साखरखेर्डा मंडळ, शेंदुर्जन मंडळ आणि दुसरबीड मंडळ येथे दिनांक ११ जूनरोजी सकाळी ११ वाजता एकाच वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरांमधून शेकडो ग्रामस्थांना महसूल, आरोग्य, कृषी, ग्रामविकास, महावितरण, पुरवठा आदी शासकीय खात्यांच्या सेवा एका ठिकाणी मिळणार आहेत. नागरिकांच्या तक्रारी, अर्ज, प्रमाणपत्र, नोंदी आदी शासकीय प्रक्रिया एकाच दिवशी आणि एका ठिकाणी हाताळण्याचा हा उपक्रम आहे. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अधिकारी : डॉ. किरण पाटील जिल्हाधिकारी, बुलढाणा, प्रा. संजय खडसे उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा, अजित दिवटे तहसीलदार, सिंदखेडराजा हे आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक शासकीय सेवा घराजवळ मिळणार असून, त्यांना शासकीय कार्यालयात वारंवार फेर्‍या मारण्याची गरज भासणार नाही. प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.


शिबिरांमध्ये उपलब्ध असणार्‍या प्रमुख सेवा

– महसूल व भूमी अभिलेख विभाग – ७/१२, फेरफार, सीमांकन, वारस दाखले
– कृषी विभाग – सल्ला, योजनांची माहिती
– आरोग्य विभाग – प्राथमिक आरोग्य तपासणी
– महावितरण – वीजबिल संदर्भातील सुविधा
– पुरवठा विभाग – रेशनकार्ड दुरुस्ती/नोंदणी
– निवडणूक विभाग – मतदार नोंदणी/दुरुस्ती
– ग्रामपंचायत, ग्रामीण विकास, अंगणवाडी, सेतु केंद्र – विविध सेवा

Share This Article
Exit mobile version