साखरखेर्डा (अशोक इंगळे) – महाराष्ट्र शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान तहसील कार्यालय अंतर्गत प्रत्येक महसूल मंडळात राबविण्यात येत असून, दिनांक ११ जून रोजी सागरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयात या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी साखरखेर्डा महसूल मंडळातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
सर्व सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचा महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रकरणाचे निराकरण करणे व जनतेच्या तंक्रारी तत्पर निकालात काढणे. तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या विविध समस्या सोडवणे तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध उपाययोजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणे व येणार्या विविध अडचणीबद्दल नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे यामागील उद्देश असून, यावेळी बहुसंख्य नागरिकांनी महा राजस्व समाधान शिबिराचा लाभ घ्यावा। असे ग्राम महसूल मंडळ अधिकारी रघवीर सोळंके तसेच ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पोंधे, लखन राजपूत यांनी केले आहे.

