डॉ. गावित मंत्री झाले, कार्यकर्त्यांकडून नंदूरबारमध्ये जल्लोष!

editor 1 Min Read
1 Min Read

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. तर त्यांच्या निवासस्थानासमोर, पेढे भरून आणि फटाके फोडत आनंद उत्सव यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
डॉ. विजयकुमार गावित यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नंदुरबार येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडत पेढे वाटले. गेल्या आठ वर्षांपासून राजकीय अज्ञातवासात असलेल्या डॉ. विजयकुमार गावित यांना भाजपकडून मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जिल्हाभरात विविध ठिकाणी जल्लोष केला आहे.

Share This Article
Exit mobile version