– महसूल व पोलिस विभागाचा संयुक्त उपक्रम’ – आपत्तीच्यावेळी बचावकार्याचे कर्मचार्यांना मिळाले महत्वपूर्ण प्रशिक्षण
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – खडकपूर्णा प्रकल्प देऊळगावराजा येथे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. काल, दि. ५ जूनरोजी सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या शिबिरात दोन्ही तालुक्यांतील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच महसूल सेवकांसह पोलिस विभागाने सहभाग घेतला होता. तसेच, आपत्ती निवारणार्थ तयारी करण्यात आली.
प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नैसर्गिक आपत्तींच्या वेळी बचाव कार्यात वापरण्यात येणार्या रबर बोटीचे प्रात्यक्षिक करणे, चालविणे, आणि आपत्ती काळातील तत्काळ कृतीची तयारी याविषयी शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करणे हे होते. या विशेष प्रशिक्षणास तारासिंग पवार (सहाय्यक पोलिस निरीक्षक, शोध व बचाव पथक, बुलढाणा) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी बचाव कार्यातील प्रत्यक्ष अनुभव आणि तांत्रिक बाबी अधिकार्यांना समजावून सांगितल्या. कार्यक्रमाला प्रांजल पवार (निवासी नायब तहसीलदार, सिंदखेडराजा), डॉ. संतोष मुंढे (निवासी नायब तहसीलदार, देऊळगाव राजा), गजानन मनसुटे (मंडळ अधिकारी, दुसरबीड), गणेश नागरे (सहाय्यक महसूल अधिकारी, सिंदखेडराजा) तसेच के. एल. खरात, जी. एस. टेकाळे, तेजस शेट्टे, एस. डी. गवई, एस. एस. चव्हाण, जी. वाय. दराडे, ए. आर. खरात, बी. बी. गिरी, गव्हाणकर, एम. ए. उदार, एस. बी. बरांडे, एस. ए. जाधव, एस. ए. वायाळ, डी. व्ही. तांबे, पी. एस. मोरे, बी. एम. गादेवाड, पी. डी. बुरकुल यांच्यासह महसूल व पोलिस विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रशिक्षणामुळे महसूल विभागातील कर्मचार्यांना आपत्ती काळात सतर्कता, जलद प्रतिसाद व बचाव कार्यात प्रभावी समन्वय राखण्याची क्षमता प्राप्त झाली. शिबिरातील प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे सहभागी अधिकार्यांनी बचाव व आपत्ती व्यवस्थापनातील कौशल्ये आत्मसात केली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातील संकटांना सामोरे जाण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरल्याची प्रतिक्रिया सहभागी अधिकार्यांनी व्यक्त केली.