‘धनिक अ‍ॅडव्हायझर्स’मध्ये नोकरीची संधी; ‘सीएसआर’, ‘सीनिअर सीएसआर’पदाच्या जागांसाठी अर्ज मागविले!

admin 2 Min Read
2 Min Read

– बुलढाणा, मेहकर विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, अहिल्यानगर विभाग, सातारा विभागातील जागा भरणे सुरू!

मुंबई (प्रतिनिधी) – मायक्रो क्रेडिट, मायक्रो फायनान्ससाठी नावाजलेल्या विदर्भातील बुलढाणा येथे मुख्यालय असलेल्या धनिक अ‍ॅडव्हायझर्स प्रा. लि.मध्ये सीएसआर/सीनिअर सीएसआर पदाच्या जागा निघाल्या असून, या जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. बुलढाणा विभाग, मेहकर विभाग या विदर्भातील जागांसह छत्रपती संभाजीनगर विभाग, अहिल्यानगर विभाग, सातारा विभागातील रिक्त जागांसाठी हे अर्ज मागविण्यात आले असून, इच्छुकांनी ७०३०२०३१२७ या व्हॉटसअप क्रमांकावर आपले अर्ज करायचे आहेत.

विदर्भातील बुलढाणा येथे मुख्यालय असलेल्या धनिक अ‍ॅडव्हायझर्स प्रा. लि. या कंपनीने मायक्रो क्रेडिट, मायक्रो फायनान्स या क्षेत्रातील वित्त पुरवठ्यात स्वतःचे मजबूत अस्तित्व निर्माण केलेले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संदीपदादा शेळके यांच्या नेतृत्वात ही कंपनी मायक्रो फायनान्स क्षेत्रात देदीप्यमान यश प्राप्त करत आहे. या कंपनीच्या पतपुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील महिला-भगिनींसह युवावर्गाला आर्थिक सक्षमता प्राप्त झाली असून, स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. या कंपनीने आपला विस्तार राज्यभर करत, बुलढाणा, मेहकर, छत्रपती संभागीनगर, अहिल्यानगर (अहमदनगर), सातारा विभागात सीएसआर, सीनिअर सीएसआर पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
अनुभवी किंवा विनाअनुभवी उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असून, बारावी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर तरूण/तरूणी या पदांसाठी अर्ज करू शकतात. रिझ्युमे (बायोडेटा), मागील कंपनीतील अनुभव, पासपोर्ट साईझ फोटो, अनुभवाचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आशुतोष मगर यांच्या ७०३०२०३१२७ या व्हॉटसअप क्रमांकावर पाठवायचे आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनासह पीएफ सुविधा, पेट्रोल भत्ता, बिझनेस इन्सेनटीव्ह, कलेक्शन इन्सेनटीव्ह आदी सुविधांसह उमेदवारांसाठी राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी www.dhanikadvisors.com किंवा ७२१८९५०१९२ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेता येईल.

Share This Article
Exit mobile version