प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगावात नेत्ररोग शिबिर

editor 1 Min Read
1 Min Read

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) :  येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव मधील ग्रामस्थ,  नागरिक, रुग्ण यांचे साठी नेत्र तपासणी शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले.  प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव आणि ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र वाय. सी. एम. हॉस्पिटल पिंपरी यांचे वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले.

या शिबिरात सुमारे १२५ वर रुग्णांनी लाभ घेत डोळ्यांच्या विविध आजारांचे निदान व उपचार करून घेतले.  या शिबिरात तपासणी करण्यात आली. या शिबिरात वाय. सी. एम. हॉस्पिटल पिंपरीचे अधिष्ठाता डॉ. वाबळे सर, पी.एस्.एम. विभागाचे प्रमुख डॉ. पांडवे आणि नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. रूपाली आमले महेशगौरी उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, डॉ. साईनाथ मानकरी यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव येथील सर्व कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांनी शिबिर यशस्वी करण्यास विशेष सहभाग घेत नियोजन केले.

Share This Article
Exit mobile version