– जाब विचारण्यासाठी थांबले असता मोबाईल ‘स्विच ऑफ’! – माध्यमिक शिक्षणाधिकारी लोकप्रतिनिधींचेही ऐकेना, सर्वसामान्यांचे काय?
सोलापूर (संदीप येरवडे) – जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांना पाच महिन्यापासून कामासाठी हेलपाटे मारायला लावत आहेत. पाटील यांनी शिक्षणाधिकारी जगताप यांचा चांगलाच ‘तास’ घेताच त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केल्याने शिक्षणाधिकार्यांचा मनमानी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
माजी झेडपी सदस्य पाटील हे मागील पाच ते सहा महिन्यापूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकार्यांना कामासाठी पाठपुरावा करीत आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी त्यांचे काम करतो, असे आश्वासन दिले आहे. परंतु माध्यमिक शिक्षण विभागाकडे हेलपाटे मारले तर शिक्षणाधिकारी जाग्यावर तर बसत नाही, शिवाय कामही करीत नाही. यामुळे पाटीला यांनी शुक्रवारी झेडपीसमोर जवळपास तास तास ताटकळत शिक्षणाधिकार्यांची वाट पाहत बसले होते. यावरून असे लक्षात येते की, माजी झेडपी सदस्यांना सहा महिने हेलपाटे मारायला लावत असेल तर सर्वसामान्य शिक्षकांचे काय हाल होत असतील, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीदेखील एका शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे कामाबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना फोन करून सांगितले होते. परंतु माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा मनमानी कारभार आता चव्हाट्यावर येत असून, आमदार माजी सभापती यांचे ऐकत नसतील तर सर्वसामान्य शिक्षकांचे हाय हाल होत असतील, याची कल्पना करू शकता.
गेल्या पाच महिन्यापासून मी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे अल्पसंख्याक मान्यतेसाठी हेलपाटे मारत आहे. परंतु माध्यमिक शिक्षणाधिकारी हे वारंवार हेलपाटे मारायला लावत असतील तर अशा अधिकार्यांचा मनमानी कारभार किती दिवस चालणार आहे. – मल्लिकार्जुन पाटील, माजी सभापती