गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; आगीत घर जळाले!

admin 1 Min Read
1 Min Read

– शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रूक येथील घटना
– सुदैवाने जीवितहानी टळली; आगीत एक लाखाचे नुकसान

बुलडाणा/शेगाव (राजेश लोखंडे) – शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रूक गावात काल, दि.२४ मे रोजी रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने संपूर्ण घराला आग लागली. या घटनेत सुमारे एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कमलाबाई सुखदेव शिरसाट या महिला घरात स्वयंपाक करत असताना गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले, आणि घरातील सर्व वस्तूंना वेढले. ही आग इतकी भीषण होती, की घरातील सगळ्या वस्तू जळून खाक झाल्या. घटनेनंतर गावकर्‍यांनी तातडीने मदतकार्य सुरू करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. वेळेवर उपाययोजना झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. प्रशासनाने पंचनामा करून नुकसानीचे अंदाजे एक लाख रुपये इतके प्रमाण नोंदवण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून, गॅस वापरताना खबरदारी घेण्याची आवश्यकता अधोरेखीत झाली आहे. प्रशासनाने अशा प्रकारच्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी जनजागृती आणि सुरक्षेच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Share This Article
Exit mobile version