शेतकऱ्यांना सलग पाचव्या वर्षी थेट बांधावर खत!

admin 1 Min Read
1 Min Read

– रुईखेड टेकाळे येथे ६०० बॅग खत पुरवठा
– राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांची सामाजिक बांधिलकी!

बुलढाणा (राजेश लोखंडे) – शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हा समन्वयक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष आणि वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदिपदादा शेळके यांच्या संकल्पनेतून सलग पाचव्या वर्षी शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पुरवठा करण्यात आला. तालुक्यातील रुईखेड टेकाळे येथे काल, दि. २४ मे रोजी ६०० बॅग खत उपलब्ध करीत पेरणी महोत्सवाला सुरुवात झाली.

रुईखेड टेकाळे येथील शेतकऱ्यांनी ६०० बॅग खताची नोंदणी केली होती. त्यानुसार या गावामध्ये ६०० बॅग खत वाटप करण्यात आले. यावेळी माजी सरपंच बबनराव टेकाळे, माजी उपसरपंच शेषराव टेकाळे, ग्रा. पं. सदस्य अर्जुन पाटील, सुधाकर टेकाळे, गोकुळा टेकाळे, विठ्ठल टेकाळे, अनिल खंबायतकर, पंजाबराव टेकाळे, रवींद्र खेडेकर, उत्तम खंबायतकर, सुनील टेकाळे, बंडू टेकाळे, गणेश टेकाळे, भागवत टेकाळे, गजानन भानुसे, बबन टेकाळे, प्रमोद टेकाळे, रवींद्र टेकाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पुरवठा करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे ऐन पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांची खतासाठी होणारी भटकंती थांबली आहे. या गोष्टीचे मनाला समाधान असल्याचा भावना संदीपदादा शेळके यांनी व्यक्त केल्या. पेरणी महोत्सवाला शेतकऱ्यांच्या वाढता प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी बांधावर खतासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version