बुलडाणा (प्रतिनिधी) – देश स्वातंत्र्य होउन 75 वर्षे पूर्ण झाली आहे. तर या स्वातंत्र्य दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करावा म्हणून दिल्ली येथे आजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 75वा आजादी का अमृत महोत्सव निमित्त दिल्ली येथे संपन्न होणार्या ग्रेट इंडियन पार्लामेंट अवॉर्ड 2022 मधून लोणार तालुक्यातील अत्यंत सामान्य कुटुंबातील युवा नेतृत्व व सतत लोणार तालुक्यातील शेतकरी यांच्या प्रश्नाला वाचा फोडणार आणि आक्रमक भूमिका असलेल युवा नेतृत्व अनिल मोरे यांना ग्रेट इंडियन पार्लामेंट अवॉर्ड 2022 सर्वोत्कृष्ट सोशल वर्कर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 14 ऑगस्टरोजी हा पुरस्कार यांना दिल्ली येथे देण्यात येणार आहे.
अनिल मोरे यांना “ग्रेट इंडियन पार्लामेंट अवॉर्ड 2022″च्यावतीने सर्वाेत्कृष्ट सोशल वर्कर पुरस्कार जाहीर

