– कॉपीमुक्त अभियानानंतरही जिल्ह्याची गुणवत्ता झळकलीच; अमरावती विभागात दुसरा नंबर!
– मेहकर तालुक्याचा सर्वात जास्त ९८ टक्के; सर्वात कमी मलकापूरचा ८८ टक्के निकाल!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्य शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल आज, दि. ५ मेरोजी घोषित करण्यात आला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा एकूण निकाल ९८.१५ टक्के लागला आहे. यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारल्याचे या निकालातून दिसून येते. जिल्ह्यातून मेहकर तालुक्याचा निकाल ९८.४१ टक्के सर्वात जास्त लागला असून, सर्वात कमी मलकापूर तालुक्याचा ८८.४३ टक्के लागला आहे. याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक अनिल आकाळ यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना दिली. बारावी परीक्षेदरम्यान कॉपी मुक्त अभियानाची कडक अमल बजावणी करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्याचा निकाल अमरावती विभागात द्वितीय क्रमांकावर आहे. केवळ ०.४८ टक्क्यानी बुलढाणा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर घसरला. त्यामुळे ९५. ६६ टक्के निकालासह वाशीम जिल्हा अमरावती विभागात अव्वल ठरला. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी mahahsscboard in या संकेतस्थळाद्वारे 6 ते 20 मे या कालावधीत स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाइन कर्ज करण्याची सोय आहे.
तालुकानिहाय निकाल पाहता, बुलढाणा तालुक्यातून २६१७ मुले व १९४९ मुलींनी परीक्षा दिली असून, पैकी २५५७ मुले व १९०५ मुली उत्तीर्ण झाले आहेत. शेकडा प्रमाण मुले ९७.७० व मुली ९७.७४ असून एकूण ९७.७२ टक्के निकाल लागला आहे. मोताळा तालुक्यातून १०२६ मुले व ७९२ मुली परीक्षेला बसल्या होत्या. पैकी ९३१ मुले व ७५२ मुली उत्तीर्ण झाल्या असून, शेकडा प्रमाण मुले ९०.७४ मुली ९४.९४ असून एकूण प्रमाण ९२.५७ टक्के आहे. चिखली तालुक्यातून २६०६ मुले व१९१७ मुली परीक्षेला बसल्या होत्या, पैकी २५३४ मुले व १८४५मुली उत्तीर्ण झाले. याचे शेकडा प्रमाण मुले ९७.२३, मुली ९८.३४ असून, एकूण ९७.७० टक्के आहे. देऊळगावराजा तालुक्यातून मुले ७५२ व मुली ५९७ परीक्षेला बसले होते, पैकी ७१३ मुले व ५८९ मुली उत्तीर्ण झाले असून, शेकडा प्रमाण मुले ९४.८१ व मुली ९६.९८ आहे. एकूण ९५.७७ आहे. सिंदखेडराजा तालुक्यातून १८९८ मुले व १३७७ मुली परीक्षेला बसल्या होत्या, पैकी १८०५ मुले व १३२० मुली उत्तीर्ण झाले असून, मुले ९५.१० व मुली ९५.८६ आहे. एकूण ९५.४१ आहे. लोणार तालुक्यातून १२७३ मुले व ८७७ मुली परीक्षेला बसल्या होत्या, पैकी ११७८ मुले ८२१ मुली उत्तीर्ण झाल्या असून, शेकडा प्रमाण मुले ९२.५३, मुली ९३.६१ असून, एकूण ९२.९७ आहे.
राज्यात बारावीचा निकाल 91.88 टक्के; यंदाही कोकणाने मारली बाजी!
यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 94.58 टक्के इतकी असून मुलांची 89.51 टक्केवारी इतकी आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 5.07 टक्क्यांहून अधिक आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधीक लागला असून 96.74 टक्के इतका आहे. तर, सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा असून 89.46 टक्के इतका आहे. या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण 14 लाख 87,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 13 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 91.86 इतकी आहे.
मेहकर तालुक्यातून १८२९ मुले व १४२५ मुली परीक्षेला बसल्या होत्या, पैकी १७९९ मुले व १४२९ मुली उत्तीर्ण झाल्या असून, शेकडा प्रमाण मुले ९८.३५, मुली ९८.४८ असून, एकूण ९८.४१ टक्के आहे. खामगाव तालुक्यातून मुले २०२८ मुले व मुली १९०१ परीक्षेला बसले होते, पैकी मुले १८३८ व मुली १८१३ उत्तीर्ण झाल्या असून, शेकडा प्रमाण मुले ९०.५३ व मुली ९५.३७ आहे. एकूण ९२.९२ आहे. शेगाव तालुक्यातून ८१८ मुले व ८६३ मुली परीक्षेला बसल्या होत्या, पैकी ७४७ मुले व ८२१ मुली उत्तीर्ण झाले असून, शेकडा प्रमाण मुले ९१.३२, मुली ९५.१३ असून, एकूण प्रमाण ९३.२७ आहे. नांदुरा तालुक्यातून ७६४ मुले व ९०८ मुली परीक्षेला बसले होते, पैकी ६७१ मुले ८७५ मुली उत्तीर्ण झाले असून, शेकडा प्रमाण मुले ८७.८२, मुली ९६.३६ असून शेकडा एकूण ८२.४६ आहे. मलकापूर तालुक्यातून मुले ११२५ व मुली १०९० परीक्षेला बसले होते, पैकी ९९३ मुले व ९९५ मुली उत्तीर्ण झाले असून, शेकडा प्रमाण मुले ८५.६०, मुली ९१.२८ असून एकूण सर्वात कमी म्हणजे ८८.४३ निकाल आहे. जळगाव जामोद तालुक्यातून ९२८ मुले ८३० मुलींनी परीक्षा दिली. पैकी ८७७ मुले व ८७० मुली उत्तीर्ण झाल्या असून, शेकडा प्रमाण मुले ९४.५०, मुली ९७.१० असून, एकूण ९५.७३ आहे तर संग्रामपूर तालुक्यातून ८३४ मुले व ७१२ मुलींनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली असून, ८१५ मुले व ७०६ मुली उत्तीर्ण झाले आहे.शेकडा प्रमाण मुले ७.७२, मुली ८९.१५ असून, एकूण ९८.३८ आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक अनिल आकाळ यांनी दिली आहे.
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७.१४ टक्के लागला आहे. परीक्षेला ३५ विद्यार्थी बसले होते, पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम गणेश गजानन बुंदे ७३.३३ टक्के, द्वितीय कु. वैष्णवी भानुदास मुंडले ७२.८३ टक्के तर कु. साक्षी गोपाल नावकार ७१.२३ टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे, अशी माहिती प्राचार्य अशोक खोरखेडे यांनी दिली.
————

