श्री स्वामी समर्थ राष्ट्रीय सत्संगासाठी सिंदखेडराजानगरी होतेय सज्ज!

admin 2 Min Read
2 Min Read

– दि. २० मेरोजी गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत भव्य सत्संगाचे आयोजन
– आमदार मनोज कायंदे यांच्याकडून कार्यकर्ते, प्रशासनाला काटेकोर नियोजनाचे निर्देश!

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – येत्या २० मेरोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ परिवाराचा राष्ट्रीय सत्संग सोहळा गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात देशभरातून येणार्‍या भाविक व सेवेकर्‍यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे निर्देश आमदार मनोज कायंदे यांनी स्वयंसेवक, कार्यकर्ते व प्रशासनाला दिले आहेत.

सत्संगाच्या नियोजनासाठी सिंदखेडराजा नगरपरिषद कार्यालयात विविध विभागांच्या अधिकार्‍यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी आमदार कायंदे म्हणाले की, रस्ते, विजेची व्यवस्था, वाहनतळ, पाणीपुरवठा व स्वच्छता या सर्व गोष्टींचे नियोजन वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमामुळे शहराची धार्मिक प्रतिष्ठा वृद्धिंगत होणार आहे, त्यामुळे सर्वांनी समन्वयाने काम करावे. या बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. संजय खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णूभाऊ मेहेत्रे, नगरपरिषद प्रशासक आशीष बोबडे, अभियंता सतीश वाकडे, पोलिस निरीक्षक ब्रह्मदेव शेळके, गटविकास अधिकारी अंकुश मस्के, नायब तहसीलदार श्री. वराडे, विद्युत महावितरणचे श्री. पडघान, वैद्यकीय अधीक्षक, पुरातत्व विभागाचे अधिकारी तसेच श्री स्वामी समर्थ सेवेकरी कैलास पालवे, प्रदीप घुगे व नीलेश देशमुख आदींसह स्वयंसेवक, कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. सेवेकरींच्या माध्यमातून या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरु असून, यशस्वी आयोजनासाठी प्रशासन, कार्यकर्ते व सेवेकरी एकत्रितपणे कार्यरत आहेत.

Share This Article
Exit mobile version