राजेंद्र काळे, प्रताप मोरे, समाधान म्हस्के, भगवान नागरे यांचा ‘देशोन्नतीकार’ प्रकाश पोहरेंच्याहस्ते सन्मान

admin 4 Min Read
4 Min Read

– दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांनी ‘वृत्तदर्पण’चे सलग १००० आठवड्याचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्याबद्दल सन्मान
– ग्रामीण भागातून वृत्तलेखनातील उल्लेखनीय कर्तृत्वाबद्दल प्रथम पुरस्काराने पत्रकार प्रताप मोरे सन्मानीत
– समाधान म्हस्के पाटील, भगवान नागरे यांचाही जाहिरात, वितरण व वृत्तलेखनाबद्दल महत्वपूर्ण गौरव

चिखली/बुलढाणा (प्रताप मोरे) – विदर्भातील आघाडीचे दैनिक तथा शेतकर्‍यांचे मुखपत्र असलेले दैनिक देशोन्नतीचा वर्धापन दिन व वार्ताहर मेळावा अकोला येथील वेदनंदिनी येथे थाटात पार पडला. या मेळाव्यात दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांनी जिल्ह्यात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या ‘वृत्तदर्पण’ स्तंभाचे सलग १००० आठवडे लिखानाचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्याबद्दल त्यांना लोकनायक, शेतकरी नेते तथा देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले. यासह, ग्रामीण भागातून वृत्तलेखनातील उल्लेखनीय कर्तृत्वाबद्दल प्रथम पुरस्काराने पत्रकार प्रताप मोरे यांचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातून द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल समाधान म्हस्के पाटील, भगवान नागरे यांचाही जाहिरात, वितरण व वृत्तलेखनाबद्दल प्रकाश पोहरे यांच्यासह बुलढाणा आवृत्तीप्रमुख राजेश राजोरे, जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

दैनिक देशोन्नतीमध्ये ग्रामीण भागातून जाहिरात, वितरण आणि संपादकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मेरा बुद्रूक गावाचे प्रतिनिधी प्रताप मोरे यांना प्रथम पुरस्काराने सन्मानीत केले गेले. तसेच, जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांनी सलग १००० आठवड्याचा स्तंभलेखनाचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्याबद्दल तसेच देशोन्नतीच्या जिल्ह्यातील वाढीत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल प्रकाश पोहरे, राजेश राजोरे यांच्यासह मेहकरचे तालुका प्रतिनिधी सिद्धेश्वर पवार, देऊळगावराजा शहर प्रतिनिधी सुषमा राऊत, सिंदखेडराजा शहर प्रतिनिधी गजानन मेहेत्रे यांनीदेखील राजेंद्र काळे यांचा विशेष सत्कार यावेळी केला. तसेच, हिवरा आश्रमचे प्रतिनिधी समाधान म्हस्के पाटील यांनी जाहिरात विभाग ग्रामीण विभागातून जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकाविल्याबद्दल त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच, सिंदखेडराजा तालुक्यात उत्कृष्ट बातम्या दिल्याद्दल भगवान नागरे यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रकाश पोहरे, राजेश राजोरे, राजेंद्र काळे यांच्याहस्ते प्रदान करून त्यांचाही गौरव करण्यात आला. दैनिक देशोन्नतीच्या परंपरेनुसार अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यातील सर्व एजंट व वार्ताहरांच्या वार्षिक मेळाव्याचे आयोजन अकोला येथील वेदनंदिनी अ‍ॅग्रो टुरिझम येथे लोकनायक तथा देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या मेळाव्याप्रसंगी देशोन्नतीचे उपाध्यक्ष तथा जाहिरात महाव्यवस्थापक उमेश सापधारे, बुलढाणा आवृत्ती प्रमुख राजेश राजोरे, वाशिम शाखा व्यवस्थापक रवी कुटे, राजेंद्र काळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या मेळाव्यात ज्या पत्रकारांनी उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट वृत्तकथा यावर उत्कृष्ट लिखान केले. तसेच वर्षभरात जाहिरात व्यवसाय चांगल्या प्रकारे केला, अशा पत्रकार व एजंट बंधु-भगिनींचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यात बुलढाणा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून जाहिरात, वितरण आणि संपादकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मेरा बुद्रूकचे पत्रकार प्रताप मोरे यांना प्रथम पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला जिल्ह्यातून मेहकर तालुका प्रतिनिधी मेहकर सिद्धेश्वर पवार, मलकापूरचे तालुका प्रतिनिधी हरी गोसावी, चिखलीचे तालुका प्रतिनिधी समाधान गाडेकर, देऊळगावराजाच्या तालुका प्रतिनिधी सुषमा राऊत, सिंदखेडराजाचे अशोक इंगळे, शेगावचे अमर बोरसे, बुलढाणाचे संजय देशमुख, तथा आदी ग्रामीण भागातील एजंट व वार्ताहर उपस्थित होते.
या उल्लेखनीय यशाबद्दल ब्रेकिंग महाराष्ट्र परिवाराशीदेखील जुळलेले प्रतापराव मोरे, राजेंद्र काळे, समाधान म्हस्के पाटील, भगवान नागरे यांचे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मुख्य संपादक पुरूषोत्तम सांगळे, संपादक बाळू वानखेडे, हेमंत चौधरी, विभागीय ब्युरो चीफ राजेश लोखंडे, कार्यकारी संपादक धम्मप्रिया कांबळे, जिल्हा प्रतिनिधी महेंद्र हिवाळे, विशेष प्रतिनिधी संजय निकाळजे, सिंदखेडराजा विशेष प्रतिनिधी अशोक इंगळे, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी सुरेश हुसे, लोणार विशेष प्रतिनिधी ऋषी दंदाले, देऊळगावराजा तालुका प्रतिनिधी राजेंद्र डोईफोडे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी पल्लवी मुंढे, मुंबई विशेष प्रतिनिधी प्राची कुलकर्णी, पुणे प्रतिनिधी सोनिया नागरे तसेच महाव्यवस्थापक आशीष गुप्ता यांनी अभिनंदन केले आहे.

Share This Article
Exit mobile version