– जुन्या आठवणींना दिला उजाळा, शिक्षकांचा केला गौरव! – समाजाच्या जडणघडणीत योगदान द्या – शेणफडराव घुबे यांचा सल्ला
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – येथील स्थानिक जानकीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देऊळगाव घुबे येथे शैक्षणिक सत्र २००५ ते २००७ मध्ये १० वी ते १२ वीला शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा काल उत्साहात पार पडला. यावेळी या सर्वांनी आपल्या गुरूजणांचा यथाेचित सन्मान केला, तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी समाजाच्या जडणघडणीत याेग द्या, असा सल्ला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेणफडराव घुबे यांनी या विद्यार्थी व विद्यार्थिनी राहिलेल्या समाजघटकांना दिला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेणफडराव घुबे तर प्रमुख अतिथी म्हणून भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.उद्धव घुबे, प्राचार्य हरिदास घुबे, सहाय्यक शिक्षक संजय सावंत, के बी तायडे, एल एस घुबे, एस बी सावळे, सौ राऊत, प्रा व्ही एम अंबासकर, लिपिक एस जी लहाने, एम पी हरकळ, जगन्नाथ घुबे, राजेंद्र घुबे हे उपस्थित होते. यावेळी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षकांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवण सांगितल्या. २० वर्षानंतर एकत्रित आलेल्या माजी विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपला परिचय देऊन आपण सध्या करीत असलेल्या व्यवसाय, नोकरीची माहिती दिली. यावेळी के बी तायडे, एस आर सावंत, एल एस घुबे, प्राचार्य हरिदास घुबे, प्रा अंबासकर यांची भाषणे संपन्न झाली. अध्यक्षीय भाषणात शेणफडराव घुबे यांनी वीस वर्षानंतर सर्व जण एकत्रित जमल्याचा आनंद व्यक्त करीत समाजाच्या जडणघडणीत आपण योगदान द्यावे, ही अपेक्षा व्यक्त केली. या वेळी माजी विद्यार्थी गणेश ज्ञानेश्वर घुबे, संतोष जगन्नाथ घुबे, परमेश्वर घुबे, संतोष जावळे, संभाजी घुबे, परमेश्वर घुबे, सुधाकर वानखेडे, सचिन वानखेडे, आशा इंगळे, अर्चना बंगाले, लता घुबे, वंदना घुबे व इतर माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी ७० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत जावळे यांनी तर आभार प्रदर्शन संतोष जावळे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अमोल घुबे, शिवानंद मुंडे, निलेश नरवाडे, परमेश्वर घुबे, बंडू कोकाटे, आत्माराम घुबे, हरिओम काकडे, विनोद ओंकार घुबे यांनी प्रयत्न केले. यावेळी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.