घराची भिंत काेसळली, गरीब कुटुंबाचे माेठे नुकसान

editor 1 Min Read
1 Min Read

घराची भिंत काेसळली, गरीब कुटुंबाचे माेठे नुकसान

धुळे (ब्युराे चीफ) – दाेन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हातमजुरी करून उदनिर्वाह करणाऱ्या इसमाच्या घराची भिंत पडून नुकसान झाल्याची घटना देवपूर परिसरात घडली आहे.  सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी जीवनावश्यक वस्तूंचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.

शहरातील देवपूर परिसरात मातोश्री रमाबाई नगर परिसरात सतीश जगन्नाथ बोरसे हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात.  हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करणाऱ्या सतीश बोरसे यांच्यावर दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने घाला घातला.  शुक्रवारी मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक बोरसे यांची घराची भिंत पाण्यामुळे कोसळली. सुदैवाने बोरसे कुटुंब सुरक्षित असून घरातील संसार पयोगी साहित्यासह जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.  याबाबत प्रशासनाने आर्थिक मदत मिळवून देत आपल्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे अशी मागणी सतीश बोरसे यांनी केली आहे.

Share This Article
Exit mobile version