विहिरीत उडी घेवून विवाहितेची आत्महत्या

breakingmah 1 Min Read
1 Min Read

चिखली( ब्रेकिंग महाराष्ट्र) : शौचालयासाठी गेलेल्या २३ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.  ही घटना ६ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास चिखली तालुक्यातील भरोसा येथे उघडकीस आली.  या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

जाफ्राबाद तालुक्यातील सोनगिरी येथील स्वाती हिचा विवाह चिखली तालुक्यातील भरोसा येथील परमेश्वर थुट्टे यांच्या सोबत तीन वर्षापूर्वी झाला आहे.  या दांपत्यास 1 वर्षाची मुलगा आहे. दरम्यान 6 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारस स्वाती परमेश्वर थुट्टे वय 23 ही शौचालयासाठी घराबाहेर पडली. ती परत आलीच नाही.  त्यामुळे बराच वेळ होऊनही स्वाती ही घरी न परतल्याने तिचा शोध सुरू केला. नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला.  स्वातीचा शोध सुरू असताना गावाजवळ असलेल्या गट न २६ मध्ये दुर्गादास लक्ष्मण शिवरकर यांच्या विहिरीच्या काठावर स्वातीच्या चपला दिसून आल्या.  त्यामुळे संशय आल्याने नागरिकांनी गळ टाकून विहिरीत शोध घेतला असता गळात अडकून स्वातीचा मृतदेह बाहेर आला.  या घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.  या प्रकरणी पुढील तपास अंधेरा पोलीस करीत आहे.

Share This Article
Exit mobile version