राहेरी येथील अटलबिहारी वाजपेयी विद्यालयाचे ऑलिम्पियाड परीक्षेत अभूतपूर्व यश!

admin 1 Min Read
1 Min Read

– गणितात १४ तर विज्ञानात एक सुवर्णपदक पटकावले; गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रत्यक्ष फलित!

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील अटल बिहारी वाजपेयी विद्यालय, राहेरी बु. येथील विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये जबरदस्त यश संपादन करत शाळेचा आणि परिसराचा गौरव वाढवला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेतील विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान, इंग्रजी व सामान्य ज्ञान या विषयांमध्ये परीक्षेत सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे, गणित विषयात १४ विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले असून, विज्ञान विषयात एका विद्यार्थ्याने गोल्ड मेडल पटकावले. तसेच इतर सहभागी विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या यशस्वी उपक्रमाच्या निमित्ताने शाळेमध्ये छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक देशमुख सर, कॉन्व्हेंट विभागाच्या मुख्याध्यापिका सरनाईक मॅडम, तसेच वाघ सर, गायके सर, नागरे सर, खाडे मॅडम, वैद्य मॅडम, प-हाड सर, चतुर सर, देशमुख मॅडम, बिथरे मॅडम, पूजा देशमुख मॅडम आदी शिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापक देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत म्हटले की, ‘या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचा पाठिंबा कारणीभूत आहे. हे यश शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे प्रतीक आहे.’ शाळेच्या या यशामुळे पालक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिकांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Share This Article
Exit mobile version