हवेली तहसीलदारांचा वाळूतस्करांना दणका; लाखाेंचे वाळूउपसा साहित्य जप्त

editor 1 Min Read
1 Min Read

हवेली तहसीलदारांचा वाळूतस्करांना दणका;  वाळू उपसा साहित्य जप्त, गुन्हा दाखल!

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : शिवणे ( ता.हवेली )  येथील नदी पात्रात काल रात्री भर पावसात हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी ( दि. ४) धडक कारवाई करून वाळू चोरी करणारे एक जेसीपी मशीन यंत्र आणि ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली.  या संदर्भात वारजे पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदारांच्या या कारवाईने वाळूतस्करांमध्ये घबराट पसरली आहे. या नदीपात्रात माेठ्या प्रमाणात वाळूतस्कर सक्रीय झाले असून, त्यांना राजकीय वरदहस्त असल्याने ते खुलेआम वाळूतस्करी करत असल्याचे दिसून येत आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांकडून शिवणे येथे नदी पात्रात जेसीपी चालला आहे, अशी माहिती तहसीलदार कोलते यांना मिळाल्यानंतर तातडीने त्यांनी नदी पात्राच्या दिशेने धाव घेतली.  संबंधित वाळू उपसा करणारे यांना तहसीलदार या भागात येत असल्याची बातमी बहुतेक कळल्याने नदी पात्रा मधून नुकतेच बाहेर पडताना एक जेसीपी मशीन त्या सोबत ट्रॅक्टर ट्रॉली व ट्रॉलीमध्ये वाळू चाळायची चाळण यांच्यासह मुद्देमाल त्यांनी जप्त करून वारजे पोलीस स्टेशनचे पीआय यांच्या ताब्यात मुद्देमाल दिल्याची माहिती त्यांनी दिली.  या मुळे परिसरात वाळू उपसा करणा-यांनी त्यांच्या धडक कारवाईचा धसका घेतला आहे.

Share This Article
Exit mobile version