मोर्शीत नवनिर्वाचित खा. डॉ.अनिल बोंडे यांचे स्वागत

editor 1 Min Read
1 Min Read

मोर्शीत नवनिर्वाचित खा. डॉ.अनिल बोंडे यांचे स्वागत

मोर्शी : नुकताच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे नेते राज्याचे माजी कृषीमंत्री तथा भाजपा किसान आघाडीचे सरचटणीस डॉ. अनिल बोंडे यांचे मोर्शी शहरात प्रथम आगमना शिवछत्रपती चौकात शिवाजी महाराजांच्या मूर्ती चे पूजन करून रॅली जयस्तंभ चौक, रामजी बाबा चौक, तारामाता संस्थान इत्यादी ठिकाणी सोमवार दिनांक 13 जून रोजी ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या अतिषबाजीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.

जयस्तंभ चौक येथे नवनिर्वाचित खासदार डॉ. अनिल बोंडे व डॉ वसुधा बॉंडे यांनी गणपती मंदिराजवळ महाआरती केली. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे विविध आघाडीच्या महिला व अन्य पदाधिकारी हा प्रामुख्याने सहभागी होते . राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा मेघना मोहन मडघे यांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार डॉ. अनिल बोंडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मोर्शी संत्रा नगरीत स्वागत करण्यात आले .

Share This Article
Exit mobile version