आता महिला आरक्षण सोडत २५ एप्रिल रोजी

admin 1 Min Read
1 Min Read

– सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला तहसीलनिहाय; 25 एप्रिलरोजी महिला आरक्षण सोडत!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2025 ते 2030 दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या सरपंच पदांचे आरक्षण दि. 16 एप्रिल 2025 रोजी तहसीलस्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार हे निश्चित करणार आहे.

तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रीयांकरीता व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रीयांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 25 एप्रिल रोजी स. 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी याबाबतची सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version