– ग्रामस्थांचा एकजुटीतून स्वच्छ आणि सुंदर गाव घडविण्याचा निर्धार!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील साठेगाव हे जाणुबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून, हे लवकरच आदर्श गाव म्हणून ओळखले जाणार आहे. गावकर्यांनी स्वच्छ आणि सुंदर गाव या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी पुढाकार घेतला असून, ‘एक तास स्वच्छतेसाठी’ या अभिनव उपक्रमाद्वारे संपूर्ण गाव स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला आहे.
गावातील सर्व नागरिक ‘सहकार्य आणि एक तास स्वच्छतेसाठी ग्रुप, साठेगाव’ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत आहेत. या मोहिमेचा उद्देश गावाच्या स्वच्छतेसह पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करणे हा आहे. समस्त ग्रामस्थ या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत असून, लवकरच साठेगांव महाराष्ट्रातील सर्वांत स्वच्छ गावांपैकी एक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गावकर्यांच्या एकजुटीमुळे हा उपक्रम यशस्वी होत असून, स्वच्छतेच्या दिशेने साठेगांवाने आदर्श पाऊल उचलले आहे.यामध्ये अनेक समाजिक कामे लोकवर्गणीतून झाले आहेत. यामध्ये लोकनेते मुंढेसाहेब यांचे महाराष्टातील तिसरे भव्य दिव्य स्मारक प्रगतीपथावर असून, लवकरच लोकार्पण सोहळा होणार आहे.