मनुबाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

admin 2 Min Read
2 Min Read

– गावकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण; गजानन वायाळ यांचे लाभले विशेष सहकार्य!

चिखली (प्रताप मोरे) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यदिव्य अशा सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण मनुबाई येथे आज, दि. १ एप्रिलरोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांच्याहस्ते करण्यात आले.

चिखली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले मनुबाई हे गाव आहे. या गावात बौध्द समाज बांधवांची १५ ते २० घराची वस्ती आहे. त्यामुळे लोकसंख्या कमी असल्यामुळे गावात पुतळा बसविण्यासाठी खर्च करण्यात कोणीही पुढे येत नव्हते. त्यामुळे समाज बांधवांना दरवर्षी १४ एप्रि रोजी जयंती उत्सव हा फोटोला हार अर्पण करूनच समाधान मानावे लागत असे. परंतु गावातील अप्पा डोंगरदिवे, माजी सरपंच डोंगरदिवे, समाधान डोंगरदिवे, अंकुश वानखेडे, माजी सरपंच सुधाकर डोंगरदिवे, सतीश डोंगरदिवे, प्रताप डोंगरदिवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांच्याकडे धाव घेवून पुतळा बसविण्याबाबत चर्चा केली असता, लगेच गजानन वायाळ यांनी पुतळ्या देण्याचे कबूल केले. त्याचं बरोबर या पुतळ्याच्या अनावरणासाठी महिलांनी गावोगावी जावून धम्मदान जमा केले. अशा या सर्वांच्या सहकार्यामुळे आज १ एप्रिलरोजी मनुबाई गावात भव्यदिव्य अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे गजानन वायाळ यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी गजानन वायाळ, बौद्ध महासभेचे पदाधिकारी बोर्डे, प्रताप मोरे यांची भाषणे झाली, तर कार्यक्रमासाठी उपस्थित माजी सैनिक दिनकराराव डोंगरदिवे, वामन डोंगरदिवव, उत्तम डोंगरदिवे, विक्रांम पैठने, लिंबाजी डोंगरदिवे, त्रबक डोंगरदिवे, रमेश टेटवार, गायकवाड, गजानन डोंगरदिवे, मनकरना अचितराव डोगरदिवे, चंद्रकलाबाई सुधाकर डोंगरदिवे, सुभद्राबाई डोंगरदिवे, तथा आदी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्थाविक अप्पाजी डोंगरदिवे, सूत्रसंचालन सुनील अंभोरे, आभार सतीश डोंगरदिवे यांनी मानले.

Share This Article
Exit mobile version