अवैध दारूविक्रीविरोधात अंढेरा ठाणेदार अ‍ॅक्शन मोडवर!

admin 3 Min Read
3 Min Read

– अवैध दारूविक्रेत्यांवर कारवायांचे सत्र; ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या दणक्यानंतर अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले!
– तब्बल ११ कारवाया, इसरूळ, मिसाळवाडी, शेळगाव आटोळ येथे लवकरच कारवाईसत्र

चिखली (प्रताप मोरे) – भरोसा गावात राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरु असल्यामुळे हतबल झालेल्या महिलांनी पोलीस स्टेशनला जावून अवैध दारूविक्री विरोधात ठाणेदारांना निवेदन दिले होते. या निवेदनाची बातमी ब्रेकिंग महाराष्ट्रने प्रसारित करताच, ठाणेदार रुपेश शक्करगे हे अ‍ॅक्शन मोडवर येवून चक्क अवैध दारूविरोधात ११ कारवाया करून गुन्हे दाखल केले आहेत. भरोसासह इसरूळ, शेळगाव आटोळ, मिसाळवाडी येथेदेखील लवकरच कारवाईसत्र सुरू होणार असल्याने अवैध दारूविक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या ४८ गावात शांतता राहावी, यासाठी चार बीटमध्ये गावाचे विभाजन केले. मात्र गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारी वाढल्याने अंढेरा बीटमध्ये एका अनोळखी महिलेला अज्ञात लोकांनी जीवंत पेटवून देणे, अफूच्या पिकाची लागवड असणे, व मेरा बिट मध्ये अनोळखी इसमाचा तलावात मृतदेह सापडणे, दिग्रस बिट मध्ये वाळू माफी्यांचे राज, आणि शेळगाव आटोळ बिट मध्ये अवैध दारू विक्रेत्याने पोलीसाचा बळी घेणे अशा घटना घडल्याने पोलीस स्टेशन जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पानसरे यांनी एलसीबी विभागातील रुपेश शक्करगे यांच्याकडे अंढेरा पोलीस स्टेशनची जबाबदारी सोपावली. मात्र त्यांच्याकडून अवैध धंदयावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे एका पोलीस कर्मचार्‍याचा अवैध दारू विक्री करणार्‍याकडून बळी गेला आहे. अशा घटना घडतं असताना आनखी भरोसा येथील महिलांनी ठाणेदार यांना निवेदन देवून अवैध दारू विक्रीचा प्रकार उघडकीस आणून निवेदन दिले. त्यात भरोसा येथे मागील गेल्या काही वर्षा पासून अवैध देशी दारू विक्री सुरू असल्यामुळे गावात अशांतता पसरली आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावर जेष्ठ महिला पुरुष आणि तरुण तरुणीची मोठ्या प्रमाणावर रहदारी आहे. मात्र दारू पिऊन अनेक जणं रस्त्यावर धिगाणा घालून वाटेल तसे वागतात व बोलतात. जर एखाद्या महिलेने तेथे दारू पिण्यास विरोध केला तर दारू विक्रेता म्हणतो की हा रस्तासरकारचा आहे तुझ्या बापाचा नाही . असे म्हणत महिलांना अश्लील भाषेत बोलतात. यांच्या विरोधात अनेक जेष्ठ व प्रतिष्ठित लोकांनी ठाणेदार व बिट जमदार कडे तक्रारी केल्या होत्या. मात्र कार्यवाही करण्यात आली नव्हती अशा मथळ्याखाली ब्रेकिंग महाराष्ट्रने बातमी प्रसारित करताच ठाणेदार रुपेश शक्करगे हे एक्शन मोडवर येवून मंगरूळ, भरोसा, पाडळी शिंदे, शेळगाव आटोळं, दे घुबे, मेंडगाव, पिपंरी आंधळे, या गावात कार्यवाही करुण दारू बंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. सदरची कार्यवाही मध्ये ठाणेदार रुपेश शककृगेव, दुय्यम ठाणेदार जारवाल, सोनकांबळे, पोफळे, वाघ, देढे आदीनी मोलाचे सहकार्य केले. ठाणेदार शक्करगे यांनी अवैध धंद्दे, जुगार, मोबाईल वर समाजात तेढ निर्माण होईल अशा पोस्ट करणार्‍या विरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल बाबत ब्रेकिंग महाराष्ट्रशी सांगितले.

Share This Article
Exit mobile version