– पळसखेड सपकाळ येथील घटना; परिसरात भीतीचे वातावरण
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथे अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून दुचाक्या चाळल्याची घटना रविवारला रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची तक्रार पोलीस स्टेशन अमडापूर येथे तक्रार दाखल करून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गाडी मालक संकेत ज्ञानेश्वर सपकाळ हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस गाडी क्रमांक एमएच २८ बीएल २६२५ व राधेश्याम देवराव काळे हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर गाडी क्रमांक एमएच २८ एक्स ३०९४ अशा या दोन दुचाकी पळसखेड सपकाळ येथे रविवार दिनांक २३/०३/२०२५ रोजी रात्री ०२:०० वाजेच्या सुमारास पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार घडला आहे. या मध्ये दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुचाकी मालकांनी नेहमी प्रमाणे आपल्या घरासमोर दुचाकी उभ्या केलेली असताना रविवारला रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेट्रोल दुचाकी जाळल्या. रात्री दोन वाजेच्या सुमारास शेजारची महिला घराबाहेर आली असता, त्यांना दोन दुचाकी जळत असताना दिसल्या व त्यांनी आरडाओरड करत गाडी मालकांना आवाज दिला की तुमच्या गाड्या जळत आहे. दुचाकी मालक दोन्ही धावत पळत येऊन दुचाकी विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत दुचाकी मोठ्या प्रमाणात जळाल्या होत्या. या घटनेमुळे पळसखेड सपकाळ परिसरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी पोलिस प्रशासनांनी या घटनेचे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे व रात्रीची पेट्रोलिंग वाढवण्याची आवश्यकता आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासनांनी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, असे पळसखेड सपकाळ येथील व परिसरातील नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

