एकात्मिक बालविकास प्रकल्प दोन अंतर्गत तालुक्यात १२ अंगणसेविका व मदतनीस पदांसाठी भरती!

admin 2 Min Read
2 Min Read

– भरती प्रक्रिया पारदर्शक; अफवा, आमिषाला बळी पडू नका!; सीडीपीओ संदीप गवळी यांचे आवाहन

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मेहकर दोन ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा एकूण १२ रिक्त पदासाठी भरती कार्यक्रम जाहीर झाली असून, या पदांसाठी मंगळवार २५ मार्चपासून अर्ज मागविण्यात आले आहेत. दरम्यान सदर भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक होणार असून, कोणीही, कोणत्याही अफवा तसेच आमिषाला बळी पडू नये असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप गवळी यांनी केले आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मेहकर २ ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस १२ रिक्त पदासाठीची भरतीप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गोमेधर क्रमांक २,लोणी काळे व राजगड येथे अंगणवाडी सेविका या रिक्त पदासाठी तर मदतनीस पदासाठी डोणगाव क्रमांक ९, निंबा , मेळजानोरी ,पारखेड, मांडवा भाग १, बारडा, भिवापूर, द्रुगबोरी क्रमांक१ व विश्वी क्रमांक २ येथील रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यानुसार २५ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान सुट्टीचे दिवस वगळून एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प मेहकर दोन येथे अर्ज स्विकारण्यात येतील. सदर पदाकरिता पात्रता व नियम अटी सह जाहीरनामा व अर्जाचा नमुना संबंधित गावच्या ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे उपलब्ध आहे. सदर पदाकरीता शासन निर्णयातील परिशिष्ट अ प्रमाणे शैक्षणिक पात्रता, समाजिक आरक्षण, अनुभव ,अनाथ ,विधवा, निकषां द्वारे त्रयस्थ पडताळणी समितीद्वारे वस्तुनिष्ठ गुणदान होणार असून कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा तोंडी मुलाखत घेतली जाणार नाही. सदर भरती अत्यंत पारदर्शक होणार असल्याने संबंधितांनी कोणत्याही अफवा अथवा आमिषाला तसेच भ्रष्टाचाराला बळी पडू नये, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप गवळी यांनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version