प्रशासन गतिमान करण्यासाठी सिंदखेडराजा पंचायत समितीत ‘टॉक टू बीडीओ’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम

admin 3 Min Read
3 Min Read

– बीडीओ अंकुश म्हस्के यांच्या संकल्पनेतून दरशुक्रवारी थेट बीडीओंशी संवाद साधण्याची संधी
– प्रवीण गीते या उपक्रमाचे समन्वयक; राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत उपक्रम

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – सिंदखेडराजाचे गटविकास अधिकारी अंकुश म्हस्के यांच्या अभिवन संकल्पनेतून राबविण्यात येणारा नाविन्यपूर्ण ‘टॉक टू बीडीओ’ हा उपक्रम प्रशासन व जनता यांच्यातील समन्वय प्रस्थापित करून प्रशासन गतिमान करणारा ठरत आहे. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून प्रवीण गीते यांची नेमणूक करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासन गतिमान करणार, व कर्मचार्‍यांच्या मनात स्नेहभाव निर्माण करून योजनेच्या कामाला गती देत असताना, ती सेवा देणारा अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यक्तिगत व शारीरिक दोन्ही गोष्टीची काळजी घेणार असल्याचे प्रतिपादन यानिमित्ताने गटविकास अधिकारी अंकुश म्हस्के यांनी केले आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून हा नाविन्यपूर्ण उपक्रम पंचायत समिती सिंदखेडराजा येथे सुरू करण्यात आला आहे. यात सध्याच्या परिस्थितीत माणूस व त्याच्या अवतीभोवतीची परिस्थिती अतिशय गतिमान झाली आहे. या गतिमान अवस्थेत माणसातला माणूसपण हरवत चालल आहे, केवळ काम काम आणि काम आणि त्यातून निर्माण होणारा प्रचंड मानसिक ताण अशी अवस्था शासकीय यंत्रणेत निर्माण झाली आहे. आणि त्यातूनच अनेक आजारांना निमंत्रण देण्याचे काम होते आहे.. अशी परिस्थिती एकूणच सर्व प्रशासकीय व्यवस्थेची होत आहे, त्यावर प्रभावीपणे अंमलबजावणी करीत ‘टॉक टू बीडिओ’ अशी नवीन संकल्पना स्थानिक पंचायत समिती सिंदखेडराजा येथे सुरू करण्यात आली. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता एक तास सर्वांचा संवाद होईल. कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त इतरही आपल्या मनातील साचलेल्या व आपल्याला हव्याहव्याशा वाटणार्‍या गोष्टीला मुक्तपणे बोलण्याचे हे विचारपीठ असणार आहे. या माध्यमातून एकमेकाचा संवाद घडून आणणे व त्या संवादाच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेला गतिमान करणे त्याचबरोबर मानसिक दडपणातून बाहेर काढणे. बीपी, शुगर असे मानसिक आजार होऊ नये, यासाठीची वैचारिक मेजवानी या उपक्रमातून दिल्या जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन जिजामाता सभागृह पंचायत समिती सिंदखेडराजा येथे करण्यात आले आहेत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिंदखेडराजा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी अंकुशराव मस्के पाटील हे होते, या उपक्रमाचे समन्वयक म्हणून प्रवीण गीते यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या उपक्रमाची भूमिका त्यातून होणारे फायदे व हा उपक्रम समोर घेऊन जात असताना काय? करायचे किंवा काय नाही करायचे, याबाबतचा लेखाजोखा त्यांनी मांडला या कार्यक्रमाची प्रास्ताविक सहाय्यक प्रशासन अधिकारी सुनील नागरे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मिसाळ तर आभार प्रदर्शन सतीश तुरुकमाने यांनी केले. याप्रसंगी सिंदखेडराजा पंचायत समितीच्या सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version