सिंदखेडराजा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक जाहीर

admin 2 Min Read
2 Min Read

– पोट निवडणुकांसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर
– १० सदस्यांच्या व सरपंचाच्या एका जागेसाठी होणार पोटनिवडणूक
– १९ मार्चला प्रारूप मतदारयादी झाली प्रसिद्ध; २६ मार्चला अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील किनगाव राजा, वरूडी, भंडारी, तांदुळवाडी, मलकापूर पाग्रा, देवखेड, पिंपरखेड, हनवतखेड, शेंदुर्जन, सोयदेव, पाग्री उगले येथील सदस्यांसह एका सरपंचाने राजीनामा दिल्यानंतर या गावांच्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला असून, त्यासाठी मतदारयाद्यांचा कार्यक्रम राबविण्याचे आदेश सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे यांनी दिले आहेत. १९ मार्चरोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी झाली असून, हरकती व सूचना १९ मार्च ते २४ मार्च २०२५ पर्यंत दाखल करता येणार आहे. तर प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी २६ मार्च २०२५ रोजी जाहीर केली जाणार आहे.

तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त झालेल्या १० सदस्य व एक सरपंच पदासाठी पोट निवडणूक होणार आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा धुरळा पहायला मिळणार आहे. प्रभाग प्रारूप मतदार यादी ता. १९ मार्च रोजी प्रसिद्ध हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी ता. १९ मार्च ते २४ मार्च पर्यत दिला आहे. ता. २६ मार्च रोजी प्रभाग निहा अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे अशा प्रकारचा मतदार यादी चा कार्यक्रम राज्य निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आलेला आहे. तालुक्यातील किनगांवराजा येथील वार्ड क्रमांक ४ मधील महिला सदस्य यांना तीन अपत्य असल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी यांनी अपात्र केले आहे, त्यामुळे ते पद रिक्त झाले आहे. वरुडी येथील वॉर्ड क्रमांक ३ च्या सदस्यांचा मृत्यू झाला आहे, भंडारी येथील वॉर्ड क्रमांक ३ च्या सदस्यांनी राजीनामा दिला. तांदुळवाडी वार्ड क्रमांक एकचा सदस्यचा मृत्यू झाला आहे. मलकापूर पांग्रा येथे वार्ड क्रमांक ४ सदस्यचा मृत्यू, देवखेड येथील वार्ड क्रमांक ३, पिंपरखेड येथील वार्ड क्रमांक २ हनवतखेड येथील वार्ड क्रमांक २, शेंदुर्जन येथील वार्ड क्रमांक ५ च्या सदस्याचा मृत्यू झाला असल्यामुळे पदे रिक्त झाले आहे. सोयंदेव येथील वार्ड क्रमांक १ च्या सदस्यांनी यांनी जात वैधता न केल्यामुळे पद रिक्त झाले आहे. पांग्री उगले येथे सरपंचाने राजीनामा दिला असल्यामुळे सरपंच पदासाठी थेट जनतेमधून निवडणूक होणार आहे. तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार निवडणूक डॉ. प्रवीण वराडे, नागेश खरात, गणेश देशमुख यांच्यासह कर्मचारी काम करत आहे.

Share This Article
Exit mobile version