– कॉपीमुक्त परीक्षेमुळे अनेक पालकांसह विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!
चिखली (प्रताप मोरे) – इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा आटोपल्या आहेत, आणि आता निकाल कधी लागणार, कोणत्या तारखेला जाहीर होणार? याबाबत सध्या मोठी उत्सुकता विद्यार्थी व पालकवर्गाना लागली आहे.
चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महविद्यालयामध्ये गेल्या ११ फेब्रूवारीपासून तर १८ मार्च २०२५ पर्यत १० आणि १२ वीच्या परीक्षा पार पडल्या. या परीक्षा केंद्रावर बेराळा, अंचरवाडी, अंढेरा या गावाच्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी परीक्षा दिली आहे. हे परीक्षा केंद्र गेल्या काही वर्षापासून वादाच्या भोवर्यात असल्यामुळे परीक्षा बोर्डाने या परीक्षा केंद्रावर दररोज बैठक पाथकाची व भरारी पंथकाची नेमणूक केली आणि परीक्षा केंद्राचवर केंद्र संचालक म्हणून देविदास खिल्लारे, साखरखेर्डा यांच्यावर सोपावली. त्यामुळे १२ वी आणि १० वीच्या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राबाहेर कॉफी बहाद्दर फिरकलेच नाही. अंढेरा पोलिस कर्मचार्यांना ही सुटकेचा श्वास घेता आला. त्यामुळे या शाळेवरील शाळेचे पर्यवेक्षक खरात, बु्धवत, पवार, मोहोड, इंगळे, पडघान, केदार, पुनकर मॅडम, नागरे मॅडम, यांनी विद्यार्थीना चांगले शिक्षण देण्याचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे आता प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मेहनतीचे फळ कसे मिळेल, याची चिंता वाटत आहे, तर पालकदेखील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आतूर आहेत. या निकालावर अनेक विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण आणि करिअर अवलंबून असल्यामुळे निकालाची अधिकृत तारीख कधी जाहीर होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

