‘भूमिपुत्र वैद्यकीय कक्ष’च्यावतीने करण्यात येणार मोफत किडनी प्रत्यारोपण शस्त्रकिया!

admin 2 Min Read
2 Min Read

– जिल्ह्यातील गरजुंना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून मोठा दिलासा
– नाव नोंदणी सुरू, गरजुंनी लाभ घेण्याचे आवाहन

देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – केंद्रीयमंत्री आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या भूमिपुत्र वैद्यकीय कक्षाच्यावतीने मोफत किडनी प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लाट) करण्यात येणार असून, गरजु रूग्णांची नाव नोदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गरीब गरजु किडनीग्रस्त रूग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकांच्या आरोग्य सुविधेसाठी बुलढाणा येथील जनसंपर्क कार्यालयात भूमिपुत्र वैद्यकीय आरोग्य कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाच्यामार्फत रूग्णांना वैद्यकीय मदत केल्या जात आहे. आतापर्यंत भूमिपुत्र वैद्यकीय कक्षाच्यावतीने मोफत वैद्यकीय शिबिर, नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. गरजुंना वैद्यकीय सेवा आणि मार्गदर्शन देण्याचे काम केल्या जात आहे. शिवाय, ग्रामीण भागातील नागरिकांना महानगरात एम्स रुग्णालयातही आरोग्यविषयक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. येणार्‍या काळामध्ये भुमिपुत्र वैद्यकीय कक्षाच्यावतीने मोफत किडनी प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लाट) शरत्रक्रिया करण्या संदर्भात नियोजन करण्यात आले आहे. रूग्णाची नाव नोदणी करण्यात येत असून, मुत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लाट) संदर्भातील रूग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी रूग्णांची नावे भूमिपुत्र वैद्यकीय कक्षाचे प्रमुख राजू भोर यांच्याकडे नोंदवावीत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८८३०३ ३०७५४/९५५२१०५७५० हा आहे. मोफत मुत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लाट) शरत्रक्रियेचा लाभ गरजुनी घ्यावा, असे आवाहन भूमिपुत्र वैद्यकीय कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version