जिल्ह्यात पावसासह विजेचा तांडव: पत्नीचा मृत्यू तर पती जखमी; जनावरेही दगावली

breakingmah 1 Min Read
1 Min Read

बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र):- गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघड दिली होती त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यास वेळ मिळाला होता मात्र ४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात विविध भागात दमदार हजेरी लावली. चिखली, खामगाव देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मोताळा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. यावेळी पावसासोबत कडकडत्या विजेने तांडव सुद्धा मांडला. या विजेच्या तांडवात सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव शेतात काम करीत असलेल्या पती पत्नीवर वीज कोसळली त्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाले आहेत.  दुसऱ्या घटनेत मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे शिवारात वीज कोसळून दोन बैल आणि एका गायीचा मृत्यू झाला. 

 

पावसाने काही दिवस उघाड दिल्यानंतर 4 ऑगस्ट रोजी पुन्हा विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आणि सिंदखेड राजा तालुक्यातील साठेगाव येथील गजानन नागरे व त्यांची पत्नी रुक्मिणी नागरे हे त्यांच्या शेतात काम करीत होते. दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे गजानन नागरे व रुक्मिणी नागरे यांनी शेतातील एका झाडाखाली आश्रय घेतला. त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने रुक्मिणी नागरे यांचा जागीच मृत्यू झाला तर गजानन नागरे हे गंभीर असून त्यांना तातडीने उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.

दुसऱ्या घटनेत मोताळा तालुक्यातील रिधोरा येथील राजेंद्र कानडजे यांच्या धामणगाव बढे शिवारातील शेतात वीज कोसळल्याने दोन बैल ठार झाले. तर वीज कोसळल्याने धामणगाव बढे येथील कैलास त्रिंबक शहाणे यांची गाय मृत्युमुखी पडली.

Share This Article
Exit mobile version