– कोणत्याही थांब्यावरून बसल्यास सुविधा उपलब्ध!
लोणार (वाजिद खान) – दिव्यांग स्त्री-पुरूषांना काही बसमध्येच आसन आरक्षणाची सुविधा होती. विशेष म्हणजे, गाडी सुटण्याच्या ठिकाणाहूनच हे आरक्षण लागू होते. आता यापुढे सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून, ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
- एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षित आसने निश्चित करण्यात आली आहेत.
- कोणत्याही थांब्यावर दिव्यांग प्रवासी बसमध्ये चढल्यास त्यांना आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बसमधील वाहकाची असणार आहे.
- साध्या बसपासून शिवनेरी बसपर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याची सूचना एसटी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला केल्या आहेत.
आरक्षित आसन क्रमांक
बस प्रकार. आसन क्रमांक
साधी ३,४,५,६
निमआराम. ३,४
ई-शिवाई. ३,४,५,६
शिवशाही ३,४,५,६
विनावातानुकूलि ०७
त शयनयान
शिवनेरी, १३,१४
जन शिवनेरी
ई बस (छोटी) ३,४
मिडी. ३०,३१
————

