– तीन वर्षांत जिव्हाळ्याचे संबंध, रायमुलकर परिवार पोलिसांसाठी झाला भावूक!
– महाराष्ट्रातील पोलिसांना व सर्वांनाच जीव लावणारा एकमेव माणूस म्हणजे संजय रायमुलकर!
– आम्ही ड्युटी करत असताना भावाप्रमाणे राहिलो; पोलिसांची भावनिक प्रतिक्रिया
हिवरा आश्रम (समाधान म्हस्के पाटील) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिलेले पोलिस संरक्षण काढून घेतल्यानंतर मेहकरचे माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचेदेखील पोलिस संरक्षण काढून घेण्यात आलेले आहे. दरम्यान, डॉ. रायमुलकर यांच्या संरक्षणात असलेले पोलिस कर्मचारी व डॉ. रायमुलकर यांच्यात एवढे जिव्हाळ्याचे व कौटुंबीक संबंध निर्माण झाले होते, की आज या पोलिस कर्मचार्यांना निरोप देताना दोघांनाही आपले आश्रू आवरता आले नाही. डॉ. रायमुलकर यांच्या पत्नी सौ. रंजनाताई यांनी औक्षण करून या पोलिसांना निरोप दिला. यावेळी पोलिस, डॉ. रायमुलकर हेदेखील प्रचंड भावनिक झाल्याचे दिसून आले. सर्वजण ढसाढसा रडले.
या पोलिसांना निरोप देत असताना पोलिस ढसाढसा रडले. तर संजय रायमुलकर यांच्या धर्मपत्नी रंजनाताई, मुलगी नयन, सून शामलीताई यांच्या डोळ्यांमध्येसुद्धा आश्रू आले. डॉ. रायमुलकर यांनी कार्यरत असलेल्या चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल नीलेश वाकडे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल पंजाबराव शेळके, नाईक पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण वाघ, चालक पोलीस कॉन्स्टेबल विश्वास मोरे, पोलीस कॉन्स्टेबल राम आत्तरकर व पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल देशमुख या पोलिसांचा मानसन्मान आहेर करून तर नयनताई यांनी सर्व पोलिसांचे औक्षण करून सर्वांना अगदी जिव्हाळ्याने निरोप दिला. हा कार्यक्रम अगदी भावनिक व कौटुंबिक स्वरूपाचा होता. यावेळी उद्धव फंगाळ, नागेश इंगळे, अभि निकष, नागेश कांगणे, विलास आखाडे, सचिन मापारी, ओम मापारी, गणेश यांनासुद्धा आश्रू अनावर झाले होते. एखाद्या कुटुंबातील मुलगा किंवा भाऊ जर बाहेरगावी नोकरीला किंवा बाहेर देशात जात असेल तर ज्याप्रमाणे घरगुती कुटुंबात भावनिक वातावरण तयार होत असते. त्याचप्रमाणे या पोलिसासंदर्भात रायमुलकर परिवारामध्ये भावनिक वातावरण तयार झाले होते. हा प्रसंग महाराष्ट्रातील एकमेव असलेले संजय रायमुलकर व पोलिसासंदर्भात असावा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नाहीतर दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की अनेक पोलीस आमदाराकडून ड्युटी बदलून घेण्यासाठी अधिकार्याकडे मागणी करत असतात. मात्र डॉ. रायमुलकर यांच्यासंदर्भात पाहिले तर डॉ.रायमुलकर यांच्याकडे ड्युटी करण्यासाठी अनेक प्ाोलीस आपल्या वरिष्ठ अधिकार्यांना सांगत असतात, हे फक्त एक माणुसकीचे नाते एक जीवाभावाचे व जिव्हाळ्याचे नाते तयार झाल्यामुळेच घडलेले आहे. पोलिसांना डॉ. रायमुलकर यांच्याकडील ड्युटी सोडत असताना अतिशय दुःख झाले. सर्वच पोलीस अक्षरशः ढसाढसा रडले तर डॉ. संजय रायमुलकर यांनाही आपले आश्रू आवरू शकले नाही, एवढा माणुसकीबाज आमदार महाराष्ट्रात होणे नाही एवढे मात्र खरे!

