भाजप नेत्या तथा चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांना जीवे मारण्याची धमकी!

admin 3 Min Read
3 Min Read

– कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी संतप्त; चिखली पोलिसांत तक्रार दाखल!
– ‘आ.श्वेताताईंच्या विकासकामांमुळे पोटशुळ उठलेल्यांचे ताईंना संपविण्याचे षडयंत्र तर नाही ना?’; मतदारसंघात चर्चा!

चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष व लोकप्रिय आमदार तथा विकासकन्या श्वेताताई विद्याधर महाले पाटील यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे ठार मारण्याची धमकी प्राप्त झाली असून, तसे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. भाजपच्या नेत्या व विद्यमान आमदार असलेल्या एका महिला लोकप्रतिनिधीला जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने जिल्हाभरासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले असून, त्यांनी चिखली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ताईंनी मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला असून, सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांत त्यांची उंदड लोकप्रियता आहे. त्यांच्या विकासकामांमुळे काहींच्या पोटात पोटशुळ उठल्याने त्यांच्याकडून तर ताईंना जीवे मारण्याचा प्रयत्न केला जाऊन त्यांना राजकारणातून संपविले जाणार नाही ना? अशी चर्चा मतदारसंघात व्यक्त केली जात असून, त्यामुळे जनमाणस कमालीचे संतप्त झाले आहे. दरम्यान, अज्ञात आरोपीचा कसून शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

आमदार श्वेताताई महाले यांना जीवे ठार मारण्याचे एक पत्र प्राप्त झाले असून, त्यात ताईंना स्पष्टपणे जीव ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आई जगदंबेची कृपा व जनमाणसाचे त्यांना असलेले आशीर्वाद पाहाता, त्या सुखरूप राहतील, यात काही शंका नाही. परंतु, अशी धमकी देणार्‍याचा पर्दाफास व्हावा, व त्याला योग्य शिक्षा व्हावी, यासाठी भाजप कार्यकर्ते, व पदाधिकारी प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्या अनुषंगाने आज दुपारी २.०० वाजता चिखली पोलिस ठाण्यावर सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी धडकले व पोलिसांत रितसर तक्रार दाखल करण्यात आली.
चिखली मतदारसंघात आ. श्वेताताई महाले पाटील यांनी विकासाचे नवे पर्व आणले आहे. त्यांच्याच नेतृत्वात चिखली तालुक्यातील २४ गावांनीदेखील आम्हाला चिखली मतदारसंघात समाविष्ट करावे, अशी मागणी पुढे केली आहे. जात-धर्म-पक्ष असा कोणताही भेदभाव न करता, त्या प्रत्येक समाज घटकाला विकासाची समान संधी प्राप्त करून देत आहेत. प्रत्येक गावांत त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरत आहे. त्यामुळे त्यांच्या विकासकामांमुळे काहींच्या पोटात पोटशुळ उठला असावा, व त्यामुळेच त्यांना राजकारणातून संपविण्यासाठी जीवे ठार मारण्याचे षडयंत्र रचले जात असावे, म्हणून हे धमकीचे पत्र आले असावे, अशी शंका सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण झालेली आहे. त्यामुळे जनमाणस कमालीचे संतप्त झालेले दिसून येत आहे. पोलिसांनी या जीवे मारण्याच्या धमकीच्या पत्राचे धागेदोरे शोधून खरा गुन्हेगार समाजापुढे आणावा, अशी मागणीही पुढे आली आहे. दरम्यान, चिखली पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू केला असून, लवकरच आरोपी गजाआड करू, असे आश्वासन दिले आहे.

आ. श्वेताताईंना जीवे मारण्याची धमकी; चिखलीत भाजपचा चक्काजाम!

Share This Article
Exit mobile version