– हातात हात घालून गुन्हेगारीला आळा घालण्याचे केले आवाहन
– देऊळगाव साखरशात टाळ, मृदंगाच्या गजराने चढला शिवजयंती उत्सवाला साज!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – महापुरुषांनी केलेले कार्य, त्यांचे विचार, त्यामुळे झालेले बदल याचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठीच आपण महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करतो, असे प्रतिपादन जानेफळचे ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी करत, आपण सर्व मिळून काम करू व गुन्हेगारीला आळा घालू, असे भावनिक आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील माजी उपसरपंच रणजीत देशमुख यांनी आपल्या निवासस्थानी आगळावेगळा शिवजयंती कार्यक्रम दि.१९ फेब्रुवारीरोजी आयोजित केला होता. या घरगुती कार्यक्रमाला गावांतील सर्व जातीधर्माचे लोक आवर्जून उपस्थित असल्याने ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी रणजीत देशमुख यांचे कौतुकदेखील केले.
समस्त गावकरी यांचेवतीने शिवजयंतीनिमित्त रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्राची टाळ मृदंगाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. नूतन विठ्ठल सांप्रदायिक भजनी मंडळाने या मिरवणुकीला चांगलाच साज चढवला. यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आवर्जून सहभागी झाले होते. यादरम्यान युवा प्रतिष्ठानचेवतीने आयोजित कार्यक्रमात सरपंच संदीप अल्हाट यांचेहस्ते आरती करण्यात आली. यावेळी दिलीपदादा देशमुख, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश आमले, बी.एम राठोड, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देशमुख, ब्रेकिंग महाराष्ट्रचे संपादक तथा जेष्ठ पत्रकार बाळू वानखडे, शे.अबरार, रणजित देशमुख, शे.गुलाब, विश्वास सरदार,सह मान्यवर तसेच गावकरी उपस्थित होते. यावेळी शिवभक्तांना मोतीचुर लाडूचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गौरव देशमुख, शुभम मेहेत्रे, महेश समुद्रवार, दत्ता हरमकार, विशाल ढोके, सतिश ढोके, वैभव वानखडे, उमेश जाधवसह युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. ग्रामपंचायत समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ठाणेदार आजिनाथ मोरेसह मान्यवरांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी सुधाकर गायकवाड, राहुल देशमुख, संतोष बोरचाटे, सुरेश आमले, नितीन काळे सह विविध संघटना पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान, उपस्थितांना सरपंच संदीप अल्हाट यांच्यावतीने स्वादिष्ट खिचडीचे वाटप करण्यात आले. ठाणेदार आजिनाथ मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता.

