मतदारसंघात विकासाची कामे करूनही मतदारांनी का नाकारले?; मतदारांच्या भावना जाणून घेणार!

admin 2 Min Read
2 Min Read

– माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांचा जनसंपर्क दौरा सुरू!
– साखरखेर्डा येथील जगदंबा माता मंदिरात घेतली बैठक

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आपण दहा वर्षांत जी विकासाची कामे केली ती कोणीही केली नाही, मतदारसंघात जनसंपर्क माझ्या येवढा कोणाचाही नाही, तरीही पराभव झाला. या मागची कारणे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण मतदारसंघात जनसंपर्क अभियान सुरु केले आहे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी साखरखेर्डा येथील जगदंबा माता मंदिरात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शिवसेना पक्ष बांधणीसाठी जनसंपर्क अभियान सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून मतदारसंघात शिवसेनेने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन मतदार संघातील प्रत्येक गावात विकासाची कामे केली आहे. साखरखेर्डा गावात आपण आमदार असताना ग्रामीण रुग्णालयासाठी १५ कोटींचा निधी मंजूर केला. आज ते काम पुर्ण झाले आहे. पाणीपुरवठा योजना रखडली असताना भरघोस निधी मंजूर करून पाणीपुरवठा सुरळीत कसा होईल, यासाठी प्रयत्न केले. भोगावती नदीवर सात ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधले. रस्त्याची कामे केली याची जाणीव साखरखेर्डा येथील नागरिकांनी ठेवून दोन वेळा मला प्रचंड मताधिक्य दिले. त्यांनी केलेल्या सहकाराच्या उतराई करण्यासाठी मी तत्पर आहे. परंतु, इतर गावांना कामे देऊनही मतदान कमी झाले. याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यामुळे शिवसेना सभासद नोंदणी करीत असताना आपण पुन्हा मतदारांच्या भेटी घेऊन नेमकं माझं काय चुकलं हेही जाणून घेण्यासाठी संपर्क अभियान आहे, असे प्रतिपादन डॉ. खेडेकर यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष जीवनसिंह राजपूत हे होते. तर माजी समाजकल्याण सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी, ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे, तालुका युवासेना प्रमुख संदीप मगर, गोपालसिंह राजपूत, नीलेश इंगळे, बंडू मंडळकर, धर्मा मंडळकर, संतोष राजपूत, चरणसिंह राजपूत, सचिन राजपूत, किरणसिंह राजपूत, भैय्यालालसिंह राजपूत, बहाद्दूरसिंह राजपूत, मंगलसिंह राजपूत, मनोज भोसले, किरण खरात, मंगेश खंराडे, विठ्ठल जैवळ, गुड्डू भराड, नीलेश खोटे, बंटी पारधे, दीपक गवळी, रवी खरात यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
———–

Share This Article
Exit mobile version