डॉ. विकास मिसाळ यांच्यासह तीन गावांच्या सरपंचांचे उपोषण आंदोलन यशस्वी; प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्यानंतरच उपोषण आंदोलन सुटले!

admin 3 Min Read
3 Min Read

– माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मध्यस्थीने डॉ. विकास मिसाळ यांच्या नेतृत्वातील तीन गावांच्या सरपंचांच्या उपोषण आंदोलनाची यशस्वी सांगता
–  शेळगाव आटोळ-इसरूळ-बायगाव रस्त्याचे काम वेगात पूर्ण करणार, उपविभागीय अभियंत्यांचे लेखी आश्वासन
– १ मार्चपर्यंत शेळगाव आटोळ-इसरूळ रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण करणार!

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – शेळगाव अटोळ – इसरूळ – बायगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुर करण्यात यावे, देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ रस्त्याच्या संथगतीच्या कामाला गती देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी शेळगाव आटोळ – इसरूळ रोडवर मंगरूळ फाट्याजवळील संत चोखोबाराय मंदिरासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांच्या नेतृत्वात चिखली सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, शेळगाव आटोळचे प्र. सरपंच संतोष बोर्डे यांनी मागील तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्या आंदोलनाची आज (दि.१९) शिवजयंतीदिनी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, ठाणेदार विकास पाटील, आणि परिसरातील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्यानंतर व देऊळगावराजा सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता यांच्या लेखी आश्वासनाने यशस्वी सांगता झाली. दि. २५ फेब्रुवारीपर्यंत शेळगाव आटोळ-इसरूळ-बायगाव रस्त्याचे काम सुरू होणार, तसेच, १ मार्चपर्यंत शेळगाव आटोळ-इसरूळ रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण करणार असे लेखी आश्वासन उपविभागीय अभियंत्यांनी डॉ. मिसाळ यांच्यासह सरपंचांना दिले आहे.

शेळगाव आटोळ-इसरूळ-बायगाव रस्ता डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, तसेच देऊळगाव घुबे-शेळगाव आटोळ रस्ता काम दर्जेदार व जलदगतीने करण्यात यावे, अन्यथा दिनांक १७ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल, या मागण्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.विकास मिसाळ, इसरूळचे सरपंच सतीश पाटील भुतेकर, शेळगाव आटोळचे प्रभारी सरपंच संतोष बोर्डे, मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील मिसाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांना दिनांक ३ फेब्रुवारीरोजी दिले होते.

शेळगाव आटोळ-इसरूळ रस्ता कामाच्या कार्यारंभ आदेशाची मुदत संपली तरीदेखील अजूनपर्यंत संबंधित कंत्राटदार यांच्याकडून डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती. सार्वजानिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार हे या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. तसेच, तालुक्याच्या ठिकाणी जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. सदर कामासाठी तत्कालीन आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कोट्यवधी रूपये मंजूर करून आणले असतानादेखील केवळ संबंधित विभागाच्या हलगर्जीमुळे काम पूर्ण झाले नसल्याने डॉ. विकास मिसाळ यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आज सार्वजानिक बांधकाम विभाग यांच्याकडून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली. तसेच हे काम विनाखंड सुरू ठेवून काम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. याप्रसंगी माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, सार्वजानिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, ठाणेदार विकास पाटील, उपविभागीय अभियंता वाघ, कनिष्ठ अभियंता भाले, बडे, माजी सभापती सचिन शिंगणे, माजी उपसभापती राजीव जावळे, माजी पं.स.सदस्य सुनील खेडेकर, माजी संचालक मनोज खेडेकर, गजानन वायाळ, संजू खेडेकर, भिकाजी खेडेकर व परिसरातील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

उपोषण मंडपातच शिवजयंती साजरी!

Share This Article
Exit mobile version