संत सेवालाल महाराज केवळ व्यक्तीच नाही तर सामाजिक जीवन जगण्याचा मूलमंत्र देणारे एक शाश्वत विचार : प्रवीण गिते

admin 2 Min Read
2 Min Read

– सिंदखेडराजा येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – महाराष्ट्र ही संतांची व महापुरुषांची भूमी राहिली आहे. जगाला प्रेरणा देणारा विचार महाराष्ट्राच्या याच मातीतून अनेक थोर विभूतींनी दिला आहे. म्हणूनच जगात कोठेही नसलेले माणूसपण आणि नीतीमूल्ये आम्हाला आमच्या राष्ट्रात पहावयास मिळतात. खरे म्हणजे संत सेवालाल महाराज ही व्यक्ती नसून, अनेकांच्या आयुष्यात सामाजिक जीवन जगण्याचा मूलमंत्र देणारा एक शाश्वत विचार आहे. हजारो उपेक्षित माणसांना आणि उपेक्षित समुदायाला मानवी जीवन प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी त्यांच्या जीवनात केले, आणि म्हणूनच ते अनेकांच्या आयुष्यासाठी दिशादर्शक आणि पूजनीय ठरतात, असे प्रतिपादन लोकजागरचे विश्वस्त प्रवीण गिते यांनी आज (दि.१५) पंचायत समिती सभागृहात केले. संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभरात त्यांना अभिवादन केलं जात असताना मातृतीर्थ सिंदखेडराजा येथेसुद्धा संत सेवालाल महाराजांच्या वैचारिक भूमिकेला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रवीण गिते बोलत होते.

सिंदखेडराजा पंचायत समिती येथे बंजारा समाजातील महान क्रांतीकारक संत श्री सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती आज उत्साहात साजरी झाली. मध्ययुगात भारतात अनेक क्रांतिकारक संत, महात्मे होऊन गेले, ज्यांनी आपल्या आपल्या वर्तनातून, कीर्तनातून, विचारातून समाजात भक्तिभाव निर्माण केला. येणार्‍या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन होईल, असे तत्त्वज्ञान सांगितले. त्यात श्री संत श्री सेवालाल महाराज हे एक होते. श्री संत सेवालाल महाराजांचे विचार आजच्याच पिढीला नव्हे तर येणार्‍या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. त्यांचे विचार आत्मसात करून त्या विचारांवर चालण्याचा संकल्प करणे हीच त्यांच्या जन्मदिनी त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे याप्रसंगी प्रवीण गिते म्हणाले.
थोर विचारवंत, थोर सेनानी श्री संत सेवालाल महाराजांना जयंतीदिनी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराजे जाधव, चंद्रकांत साबळे माजी उपनगराध्यक्ष सिंदखेडराजा, प्रवीण गीते लोकजागर परिवार, शिवादादा पुरंदरे मनविसे, विठ्ठल चव्हाण, गुलाबराव राठोड आदी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज टी पॉईंट या ठिकाणी छावा संघटनेच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी करून पंचायत समिती प्रांगणात श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जिजाऊंच्या मातीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लढण्याचा विचार दिला : हर्षवर्धन सपकाळ

Share This Article
Exit mobile version