एमपीएससी परीक्षेत निमगाव वायाळ येथील सुशील खरात यांचे यश

admin 1 Min Read
1 Min Read

– मंत्रालयात महसूल सहाय्यकपदी झाली निवड

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेत सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील सुशीलकुमार खरात यांची महसूल सहाय्यक, (मंत्रालय) पदी निवड झाल्याने ग्रामस्थांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

वडिलांसह सुशील खरात.

राज्य लोकसेवा आयोगाने नुकताच आपला निकाल जाहीर केला. यामध्ये सुशीलकुमार खरात यांचे नाव जाहीर झाले असून, सुशील हे प्राध्यापक पुंडलिक राघोजी खरात यांचे चिरंजीव आहेत. त्यांचे वडिल पुंडलिक खरात यांनी चिंचोली बावणे येथे माध्यमिक शाळा सुरू करून गोरगरीब जनतेच्या मुला-मुलींना शिक्षणाचे कार्य सुरू केलेले आहे. सुशील खरात यांची महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, आणि मित्र परिवारातून मोठ्या उत्साहात अभिनंदन, स्वागत करण्यात येत आहे.

Share This Article
Exit mobile version