– सिंदखेडराजा येथून राजमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन आजपासून अभियानाला होणार सुरूवात! – जनसंपर्क अभियानातून गावोगावी शिवसेनेची करणार जोरदार बांधणी!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री, लाडके भाऊ शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य राज्यमंत्री व बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील २१४ गावांचा जनसंपर्क दौरा माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे रविवार, दि.९ फेब्रुवारीरोजी राजमाता जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन सुरुवात करणार आहे, तर समारोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने गावोगावी शिवसेनेची पुनर्बांधणी केली जाणार आहे.
या अभियानात शिवसेना शाखा बांधणी, शिवसेना सदस्य नोंदणी अभियान (शिवकार्य) राबविण्यात येणार आहे. शिवसेना परिवाराचे सदस्य होण्याकरिता मो. ७७०३०७७०३० या क्रमांकावर कॉल, एसएमएसद्वारे येणार्या लिंकवर माहिती भरून शिवसेनेचे अधिकृत सदस्य होण्याचे आवाहनही डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केले आहे. सर्व सामान्य जननेता तसेच शेतकरी बांधवांना महसुली कागदपत्रे काढण्यासाठी लागणारा विलंब टाळण्यासाठी, एकाच ठिकाणी अॅग्रिस्टॅक फार्मर आयडीसाठी, रेशनकार्डमध्ये नवीन नाव सामाविष्ट करणे तसेच रेशनकार्डमधून नाव वेगळे करणे, प्रमाणपत्र, डोमेसाईल, नॉनक्लिमिलिअर, उत्पत्राचा दाखला, पी.एम किसान योजना, पी.एम.निधी फण्ड, आयुष्यमान भारत, श्रावणबाळ मानधन योजना, संजय गांधी निराधार विधवा मानधन योजना, इत्यादी प्रमाणपत्रांसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रांची माहिती गावातील शिवसेना नेते अथवा शाखा प्रमुखांकडे उपलब्ध राहतील. लाभार्थी यांनी आवश्यक ती कागदपत्रे शिवसेना नेते अथवा शाखा प्रमुखांकडे जमा करावी. जेथे कॅम्प होईल तेथे सदरहू कागदपत्रे जमा करावी. कागदपत्रे उपलब्ध झाल्यानंतर गावांमध्ये अथवा सोयीनुसार विभागनिहाय कॅम्प लावून कागदपत्रांची माहिती घेवून प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार असल्याचेदेखील डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सांगितले. या जनसंपर्क अभियान व आभारामध्ये सदर गांवातील समस्या व शेतकर्यांच्या समस्यासुध्दा जाणून घेतल्या जातील. मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये सन २०१४ ते २०१९ या कालावधीमध्ये आमदार असतांना व सन २०११ ते २०२४ या कालावधीमध्ये आमदार नसतांनासुध्दा मागील गेल्या २० ते ३० वर्षांत जेवढी विकासकामें झाली नसतील, त्यापेक्षा कितीतरी पट विकासनिधी आणून प्रचंड विकास केला, याची जाणीव या मतदारसंघातील जनतेला असून, सर्वसामान्य जनता मान्य करते. मतदारसंघातील जनतेच्या सतत संपकांत राहिलो, सुखदुःखात सामिल झालो, कोणत्याही प्रकारे जाती-पातीचे राजकारण केले नाही. जो येईल त्याचे काम केले, सर्व समाजाच्या गावामध्ये विकासकामांसाठी कोणताही जातीभेद कधीही केला नाही. तरी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला. हे करत असतांना माझे काय चुकले? कोठे चुकले? याबावत गावकरी व कार्यकर्ते यांच्यासोवत चर्चा करुन आत्मचिंतन करणार असल्याचे डॉ.शशिकांत खेडेकर यांनी सांगितले. त्यामुळे गावांगावामध्ये जेव्हा जनसंपर्क अभिमान व आभार यात्रा होईल, त्या तारखेला व त्या वेळेला गावकर्यांनी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केले आहे.