अवघ्या ४ वर्षाच्या चिमुकलीवर २१वर्षीय नराधमाचा अमानुष लैंगिक अत्याचार!

admin 2 Min Read
2 Min Read

– १५ ते १६ टाके घातले, चिमुकलीची प्रकृती चिंताजनक
– नराधमाचा एन्काउंटर करा – आ. अमोल मिटकरींची मागणी

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीवर अंगात सैतान संचारलेल्या २१ वर्षी नराधमाने पाशवी लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आली असून, या घटनेने समाजमन हादरले आहे. नराधम हा मध्यप्रदेशातील डोईफोडिया गावाचा रहिवासी असून, संग्रामपूर तालुक्यातील टुणकी गावात ही अमानुष घटना घडली आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. पीडित बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सद्या तिला १५ ते १६ टाके घालण्यात आले आहेत, अतिरक्तस्त्रावाने व अत्यचाराने ती सद्या बेशुद्धावस्थेत आहे. दरम्यान, या नराधमाचा पोलिसांनी इन्काउंटर करावा, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुणगी गावामध्ये राहणार्‍या ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. २१ वर्षीय तरुणाने हे घृणास्पद कृत्य केले. चिमुकलीची प्रकृती सद्या खूपच चिंताजनक असून, तिच्यावर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिमुकलीला जवळपास १५ ते १७ टाके लागल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलिसांनी मध्यप्रदेशमधील सुनील कालुसिंग निगवाले या आरोपीला अटक केली आहे. या नराधमावर सोनाळा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास सोनाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महादेव खोने, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर तितरे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल पवार हे करत आहेत. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ वॉर्डमध्ये चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत असून, ‘पीडित मुलीच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला जवळपास दीड महिना लागणार आहे,’ अशी माहिती अकोला शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. डॉली बाशानी यांनी दिली.

Share This Article
Exit mobile version