कन्नड येथून उत्स्फूर्त प्रतिसादात प्रारंभ; राज्यभरात १०० रक्तदान शिबिरांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – दर्जेदार बँकिंग सेवा देण्यासोबतच राजर्षी शाहू मल्टिस्टेट को- ऑप. क्रेडिट सोसायटी सामाजिक उपक्रम राबवण्यातसुद्धा अग्रस्थानी आहे. दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा राज्यभरात १०० रक्तदान शिबिरे घेण्यात येणार आहेत. समाजाने संस्थेच्या या कार्याचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे डीवायएसपी विजयकुमार ठाकुरवाड यांनी केले.
संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके म्हणाल्या की, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्यावतीने राज्यभरात ५ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान १०० रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी रक्तदात्यांनी ज्याप्रमाणे उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता तसाच प्रतिसाद यावर्षी सुद्धा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. नवनिर्वाचित स्थानिक संचालक म्हणून राहुल नांगरे, प्रशांत दहातोंडे, दिलीप गांगुर्डे, छाया जाधव, रंजना पवार, भारती पाटील, ज्ञानेश्वर नांगरे, भास्कर खरे यांची नियुक्ती करुन सत्कार करण्यात आला. संचालन राज खडके यांनी केले.

