कवठळ येथे कानिफनाथ यात्रेनिमित्त भव्य शंकरपट स्पर्धा; एक लाख एक रूपयांची होणार जंगी लूट!

admin 2 Min Read
2 Min Read

– मंगळवारी शंकरपटाचे उद्घाटन; बुधवारी बक्षीस वितरण!

चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील कवठळ येथे श्री कानिफनाथ महाराज यात्रेनिमित्त मंगळवार, दि. ४ फेब्रुवारी व बुधवार, दि. ५ फेब्रुवारीरोजी भव्य शंकरपटांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एक लाख एक रूपयांची भव्य लूट होणार आहे. चिखलीचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याहस्ते या शंकरपटाचे उद्घाटन मंगळवारी होणार असून, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायळ यांच्याहस्ते बक्षीस वितरण होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

शंकरपटातील विजेत्यांसाठी एकूण १७ बक्षिसे ठेवण्यात आलेली असून, पहिले बक्षीस २१ हजार १११ रूपयांचे तर दुसरे बक्षीस १५ हजार ५१ रूपये, तिसरे ११ हजार हजार ११ रूपयांचे आहे. शेवटचे १७ वे बक्षीस २३०० रूपयांचे आहे. या स्पर्धेसाठी घडीवाले म्हणून अंकुशभाऊ लेंभे कुसळीकर हे काम पाहणार असून, मंगळवारी (दि.४) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. राहुल बोंद्रे यांच्याहस्ते शंकरपटाचे शानदार उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई खेडेकर, माजी नगरसेवक (चिखली) सचिन बोंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरदनाना हाडे, सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष गोपीनाथ लहाने, शासकीय ठेकेदार किशोर खेडेकर, गांगलगावचे माजी सरपंच गणेश म्हस्के, गांगलगावचे सरपंच नितीन म्हस्के, मनसे नेते श्रीकृष्ण अंभोरे, अंत्री खेडेकरचे ग्रामपंचायत सदस्य भिकाभाऊ खेडेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे. हा पट शासकीय नियमानुसार खेळला जाणार असून, पंच कमिटीचा निर्णय अंतिम राहणार आहे.  तरी पंचक्राेशीतील सर्व शेतकरी तसेच शंकरपटप्रेमी यांनी शंकरपटाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

Share This Article
Exit mobile version