कॉप्यांसाठी मायक्रो झेरॉक्स काढून विकणार्‍या भामट्याच्या मुसक्या आवळल्या!

admin 3 Min Read
3 Min Read

– नवनीत प्रकाशनच्या विक्रीवर परिणाम झाल्याने कंपनीच्या तक्रारीवरून पोलिसांची लक्ष्मी झेरॉक्सवर टाकली धाड
– आरोपी भगवान कांबळेच्या रंगेहाथ मुसक्या आवळल्या, साहित्यही जप्त!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील एका झेरॉक्स सेंटरवर नवनीत पब्लिकेशन्स कंपनीच्या दहावी व बारावी पुस्तकेच्या मायक्रो झेरॉक्सप्रती काढून विक्री करीत असताना एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या जवळून साहित्य जप्त केले आहे. लक्ष्मी झेरॉक्स सेंटरवर भगवान विष्णू कांबळे (वय ३१) हा ऑनलाइन प्रत डाऊनलोड करून इयत्ता दहावी व बारावीच्या नवनीत पुस्तकेच्या मायक्रो झेरॉक्स काढून विक्री करीत असल्याने साखरखेर्डा येथील पुस्तक विक्रीवर परिणाम झाला होता.

साखरखेर्डा येथील लक्ष्मी झेरॉक्स सेंटरवर नवनीत प्रकाशनच्या दहावी व बारावीच्या गाईड मायक्रो झेरॉक्स करुन विकत असल्याची माहिती प्रकाशनचे प्रतिनिधी शंकर देवलाल परदेशी यांना मिळाली. सदर लक्ष्मी झेरॉक्स सेंटरवर भगवान विष्णू कांबळे (वय ३१) हा ऑनलाइन वरून इयत्ता दहावी व बारावीच्या नवनीत पुस्तकेच्या मायक्रो झेरॉक्स काढून विक्री करीत असल्याने साखरखेर्डा येथील पुस्तक विक्रीवर परिणाम झाला होता. १ फेब्रुवारीरोजी शंकर देवलाल परदेशी यांनी साखरखेर्डा पोलिस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली असता, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण गवई यांनी ठाणेदार गजानन करेवाड यांच्या आदेशानुसार लक्ष्मी झेरॉक्स सेंटरवर धाड टाकली असता, नवनीत पुस्तकेच्या झेरॉक्स आढळून आल्या. त्या विक्री करीत असताना जप्त करण्यात आल्या. शंकर परदेशी रा. कल्याण, जिल्हा ठाणे यांच्या फिर्यादीवरून अ न ३४/२०२५ कलम ६५,६३,५१ प्रतिलिपी अधिनियम १९५७, सुधारित अधिनियम १९८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यामुळे झेरॉक्स काढून नवनीत मायक्रो गाईड झेरॉक्स विकणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.


याच महिन्यात इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. लक्ष्मी झेरॉक्स सेंटर हे तीनही परीक्षा केंद्राच्या जवळ आहे. नवनीत गाईड मायक्रो झेरॉक्स काढून मुले परीक्षा काळात कॉपी करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. पेपर संपल्यानंतर शाळेच्या परिसरात या मायक्रो झेरॉक्स गाईड विद्यार्थी फेकून देतात. त्यामुळे साखरखेर्डा परीक्षा केंद्रावर काय चालते हे कचर्‍याच्या ढिगावरुन दिसून येते. परीक्षा काळात परीक्षा सुरु असताना झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात यावे, असे आदेश असताना साखरखेर्डा येथील सर्व झेरॉक्स सेंटर सुरू असतात. परीक्षेत कोणता प्रश्न आला याची माहिती काही संस्था संचालक यांना होते. ऑनलाईनच्या माध्यमातून उत्तरे शोधून ती झेरॉक्स काढून प्रत्येक परीक्षार्थीपर्यंत काही शिक्षक व संस्था चालक करतात. हा प्रकार साखरखेर्डा येथे होतो. मागील वर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक नरवाडे यांनी प्रत्येक परीक्षा खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता. तो अंमलातही आणला होता. त्यामुळे संस्था चालक आणि शिक्षक यांच्यात खळबळ उडाली होती. संस्था चालक हे राजकीय नेतेच असल्याने त्यांनी भूमिपुत्र विवेक नरवाडे यांची तडकाफडकी बदली केली. यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, असे शासन सांगत असले तरी खरच परीक्षा कॉपीमुक्त होतील का, हा प्रश्न कायम आहे.

Share This Article
Exit mobile version