आडगाव येथील अवैध दारू, हातभट्टी बंद करण्यासाठी महिला आक्रमक!

admin 1 Min Read
1 Min Read

– उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांना दिले निवेदन
– विमलबाई शिनगारे यांच्यासह महिलांची एसडीपीओ कार्यालयावर धडक

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – सिंदखेडराजा तालुक्यातील आडगावराजा येथे गावांमध्ये देशी-विदेशी आणि हातभट्टी दारू विक्री होत आहे, त्यामुळे गावांमध्ये दारूमुळे प्रत्येक कुटुंबामध्ये कलह निर्माण झाला असून, तरूण मुलेसुद्धा व्यसनाच्या आहारी जात आहेत. कुटुंबांमध्ये दारू पिऊन भांडणे होत आहेत. त्यामुळे गावातील अवैध दारू विक्री तात्काळ थांबण्यात यावी, याबाबत आडगावराजा ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन ठरावसुद्धा घेण्यात आला. तसेच, गावातील महिलांनी थेट उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक देऊन अवैध दारूविक्रीची मागणी एसडीपीओंकडे केली आहे.

गावामधे अवैध दारू विक्रीमुळे कुटुंबामध्ये झगडे चालू आहेत. यामुळे सदर दारूविक्री बंद करण्यात यावी, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्याकडे निवेदन देण्यात आले असून, त्याचबरोबर ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांनासुद्धा निवेदन देण्यात आले आहे. आडगावराजा येथील दारू बंद न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा महिलांनी निर्धार केला आहे. निवेदनावर कमलबाई कारभारी शिंनगारे, संगीता विठ्ठल काळे, सौ.नंदा विजय सोनुने, सौ. अलका विनोद सोनुने, सौ. गोदावरी किशोर शिंदे, सौ. अनिता शिवाजी धोत्रे, नंदा बाळू कसबे, सौ. उज्वला विष्णू फुले, सौ. संगीता विष्णू खंडारे, सौ. वनिता गजानन फुले, सौ. सुनीता शिवाजी भालेराव, सौ. शोभा भगवान कहाळे, सौ.सिंधुबाई रमेश शिंदे, सौ.चंद्रभागा रामदास कहाळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

Share This Article
Exit mobile version